शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

VIDEO- अनधिकृत धर्मस्थळांवर अखेर हातोडा

By admin | Updated: December 28, 2016 20:37 IST

ऑनलाइन लोकमत चंद्रपूर, दि. 28 - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत ठरविण्यात आलेल्या १७ पैकी १२ धर्मस्थळांवर बुधवारी कारवाईचा ...

ऑनलाइन लोकमतचंद्रपूर, दि. 28 - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत ठरविण्यात आलेल्या १७ पैकी १२ धर्मस्थळांवर बुधवारी कारवाईचा हातोडा चालला. सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या या कारवाईत दिवसभरात १२ अनधिकृत धर्मस्थळांना भुईसपाट करण्यात आले. सायंकाळनंतर ही कारवाई थांबली असली तरी उद्या गुरुवारी सकाळीपासून ती पुन्हा सुरू होऊन उर्वरित पाच धर्मस्थळांना हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बुलडोजर, अग्निशामक दलाचे वाहन, सफाई कर्मचारी, पोलीस अधिकारी व शिपाई आणि महानगर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. या पथकाने पहिला हातोडा जिल्हा परिषदेलगतच्या शिवमंदिरावर आणि बाबा ताजुद्दीन यांच्या दर्ग्यावर मारला. अगदी एकमेकाला लागून असलेले हे मंदिर आणि दर्गा म्हणजे चंद्रपुरातील सामाजिक सद्भावनेचे प्रतिक समजले जात होते. या दोन्ही ठिकाणच्या इमारती केवळ अर्धा तासात भूईसपाट केल्या. अकस्मातपणे सुरू झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये प्रारंभी प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. अगदी वर्दळीच्या मार्गावर ही धर्मस्थळे असल्याने सुरक्षेच्या कारणावरून वाहतूक विभागाने प्रियदर्शनी चौकातून येणारा एकेरी मार्ग बंद केला होता. केवळ अर्धा तासात हे अतिक्रमण हटवून पथक पुढील कारवाईसाठी रवाना झाले.या ठिकाणी ही कारवाई सुरू असतानाच, मूल मार्गावरील वनविभागाच्या कार्यालयाजवळील माता मंदिरही पाडण्यात आले. नवरात्रीच्या काळात या मंदिरात मोठ्या संख्येने ओटी भरण्यासाठी येणाऱ्या महिला वर्गात आणि नागरिकांमध्ये यामुळे हळहळ व्यक्त होताना दिसली. मात्र न्यायालयाच्या आदेशानेच ही कारवाई सुरू असल्याचे लक्षात आल्यावर विरोधासाठी कुणीही सामोरे आले नाही.महानगर पालिकेने आणि पोलीस विभागाने या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी मनपाच्या झोननिहाय तीन पथके स्थापन केली होती. या पथकांचे नेतृत्व सहाय्यक आयुक्त विजय देवळीकर, सचिन पाटील आणि अश्विनी गायकवाड या अधिकाऱ्यांकडे होते. त्यांंनी दिवसभर पथकासोबत राहून ही कारवाई पार पाडली. या सोबतच चंद्रपूर मनपाचे उपायुक्त रामनगर पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक कोळी, डॉ. विजय इंगोले सर्व घटनास्थळी प्रामुख्याने उपस्थित होते. बुधवारी दिवसभरात एकूण १२ अनधिकृत प्रार्थनास्थळे हटविण्यात आली. यात, मूल मार्गावरील माता मंदिर, जिल्हा परिषदेलगतचे शिवमंदिर आणि ताजुद्दीन बाबा दर्गा, अरविंदनगर येथील शिवमंदिर, गंज वॉर्डातील नागमंदिर, बागला चौकातील हनुमान मंदिर, महाकाली मंंदिराजवळील वाघोबाची तीन मंदिरे, तुकूम परिसरातील पाच मंदिरे हटविण्यात आली. आक्षेपावरील उत्तरानंतरच कारवाईमुंबई उच्च न्यायालयाने २००९ नंतर बांधण्यात आलेली सर्व धार्मिक स्थळे अवैध ठरविली आहेत. या अवैध धार्मिक स्थळांवर मे २०१६ पर्यंत कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. चंद्रपूर शहरात प्रारंभी ५९० धार्मिक स्थळे अनधिकृत आढळली होती. त्यांवर संबंधितांकडून आक्षेप मागविल्यावर ३१ धार्मिक स्थळे २९ सप्टेंबर २००९ नंतरची आढळली होती. नंतर त्यातील काहींकडून आक्षेपावर उत्तरे आल्यावर १७ धर्मस्थळे अवैध ठरविण्यात आली होती. पालिकेने संबंधित व्यवस्थापकांना नोटीस बजावून धार्मिक स्थळ निष्काशित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी प्रशासनासोबत बैठका घेवून सामंजस्याने तोडगा काढण्यात आला होता. त्यामुळेच कारवाई सुरु असताना विरोध दिसला नाही.

न्यायालयाच्या आदेशावरूनच ही कारवाई सुरू आहे. नागरिकांनीही या मोहिमेला सहकार्य केले आहे. आज १२ अतिक्रमणे हटविण्यात आली असून गुरूवारी उर्वारित पाच अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली जाईल.- डॉ. विजय इंंगोले, उपायुक्त मनपा, चंद्रपूर

https://www.dailymotion.com/video/x844mrd