शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - महाराष्ट्राच्या वीरपुत्राला सलाम, संदीप ठोक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By admin | Updated: September 19, 2016 23:51 IST

तालुक्यातील खडांगळी येथील शहिद जवान संदिप सोमनाथ ठोक यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. १९ : तालुक्यातील खडांगळी येथील शहिद जवान संदिप सोमनाथ ठोक यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भूसे, प्रांताधिकारी महेश पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधि, ग्रामस्थ मोठ्या संखेने हजर होते. 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लष्करात भरती होण्याची जिद्द पहिल्यापासून संदिपच्या मनात होती. संदीप पदवीधर असून 2014 मध्ये सैन्य दलात भरती झाले. बिहार, बंगलोर, पश्चिम बंगाल, भूतान व जम्मू काश्मीर येथे त्यांनी काम केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.

 

 रात्री उशीरा ओझर विमानतळावरुन त्यांचे पार्थिव खडानगळी गावाकडे रवाना झाले. १० वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या मुळ गावी पोहचले. गावातील महिलांनी स्मशानभुमीकडील रस्त्यावर रांगोळ्या काढल्या, फुलांच्या माळासह संपुंर्ण परिसर सुशोभित करण्यात आला होता. शहीद संदीप ठोक अमर रहेच्या घोषणांनी परिसर गहिवरला. परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. शासकीय अधिकारी तेथे होते. काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील १८ जवान शहीद झाले आहेत, यामध्ये महाराष्ट्रातील ४ सुपुत्रांचा समावेश आहे. प्राणहानीच्या दृष्टीने अलीकडच्या काळातील लष्करी तळावरील हा सर्वांत भीषण हल्ला होता. दरम्यान या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी १५ लाखांची मदत जाहीर केली आहे.