शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : महाड दुर्घटना - ८ दिवसांनी सापडले एसटी बसचे सांगाडे

By admin | Updated: August 11, 2016 13:49 IST

मागच्या आठवडयात महाड सावित्रीनदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या दोन एसटी बसचे सांगाडे सापडले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

महाड, दि. ११ - मागच्या आठवडयात महाड-पोलादपूरला जोडणा-या सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बस वाहून गेल्या होत्या. या दुर्घटनेतील दोनपैकी एका एसटी बसचे सांगाडे सापडले आहेत. 
 
दुर्घटनेनंतर तब्बल आठ दिवसांनी हे सांगाडे शोधण्यात यश मिळाले आहे.  दुर्घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर हे अवशेष सापडले आहेत. हे सांगाडे बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली आहे. शोधकार्य सुरु असताना नौदलाला हे सांगाडे सापडले. सीवित्रीची जलपातळी सध्या कमी झाली आहे. पाण्याचा वेगही कमी आहे. 
 
नौदलाच्या पाणबुड्यांनी आज सकाळी सलग तीन तास पाण्याखाली सर्च ऑपरेशन केले. त्यावेळी एकाच एसटीचा सांगाडा सापडला. सापडलेल्या सांगाड्यात मृतदेह नसल्याची माहिती नौदलाच्या पाणबुड्यांनी दिली.  रायगड आपत्ती नियंत्रण यंत्रणेचे प्रमुख व निवासी उप जिल्हाधिकारी सतिश बागल यांनी ही माहिती दिली .
 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-पोलादपूरला जोडणारा सावित्री नदीवरील जुना ब्रिटीश कालीन पूल मंगळवारी रात्री दोन ऑगस्टला कोसळला. या दुर्घटनेत  एकूण ४२ जण बेपत्ता झाले होते. त्यातील काही जणांचे मृतदेह सापडले. 
 
पूल कोसळला त्यावेळी दोन एसटी बससह काही छोटी वाहने प्रवाहात वाहून गेली होती. दुर्घटनेनंतर दोन ते तीन दिवस पावसाचा जोर आणि सावित्री नदीची धोकादायक पातळी यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.   एनडीआरएफ, तटरक्षक दल आणि नौदलाचे नदीच्या वेगवान प्रवाहातही शोधकार्य सुरु होते.