शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : गोंदियात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले : दोन पायलट ठार

By admin | Updated: April 26, 2017 17:23 IST

   विजेंद्र मेश्राम/हुपराज जमईवार/ऑनलाइन लोकमत  गोंदिया, दि. 26 -  गोंदियाजवळील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डान प्रशिक्षण संस्थेचे (एनएफटीआय) प्रशिक्षणार्थी ...

 

 विजेंद्र मेश्राम/हुपराज जमईवार/ऑनलाइन लोकमत

 गोंदिया, दि. 26 -  गोंदियाजवळील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डान प्रशिक्षण संस्थेचे (एनएफटीआय) प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील वैनगंगा नदीत कोसळले. यात प्रशिक्षक व शिकाऊ पायलट तरुणी ठार झाले. मृतांमध्ये वरिष्ठ प्रशिक्षक रंजन गुप्ता (४५) आणि प्रशिक्षणार्थी पायलट हिमानी गुरूदाससिंह कल्याणी (२४) रा.दिल्ली यांचा समावेश आहे. सकाळी ९.२५ च्या सुमारास ह्यडीए-४२ नाईकह्ण या चार आसनी विमानाने बिरसी विमानळावरून उड्डान केल्यानंतर जवळपास ९.४० पर्यंत हे विमान बिरसी विमानतळावरील एअर ट्राफिक कंट्रोल (एटीसी) रुमच्या संपर्कात होते. परंतू त्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला. विमान काही विशिष्ट पातळीपेक्षा कमी उंचीवर आल्यास एटीसीसोबत संपर्क तुटतो. त्यामुळे काही वेळात विमान पुन्हा संपर्कात येईल याची एटीसीमधील कर्मचारी वाट पाहात होते. पण १० मिनिटात संपर्क न झाल्यामुळे त्यांनी एनएफटीआय आणि बिरसी विमानतळाच्या संचालकांना माहिती दिली. विमानाच्या शेवटच्या लोकेशनवरून शोधाशोध केली असता हे विमान गोंदियापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवरी-लावणी या गावांजवळील वैनगंगा नदीच्या पात्रात कोसळल्याचे आढळले.ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणी नदीचे पात्र लहान आणि पाणीही कमी होते. पण विमान खाली कोसळताच त्याचे तुकडे झाले. त्यातच विमानातील दोन्ही पायलट दबल्या जाऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. रोप-वे च्या तारात अडकले प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान वैनगंगा नदीवरून अत्यंत खालच्या बाजुने उडत येत होते. यामुळे हे विमान वैनगंगा नदीच्या काठावरील दोन तिरांवर असलेल्या देवरी आणि लावणी गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटू नये म्हणून तयार केलेल्या ५० फूट उंचीवरील रोप-वे च्या ताराला स्पर्शुन गेले. यामुळे हे विमान अनियंत्रित होऊन नदीपात्रात कोसळले. विमान कोसळत असताना तिथे कपडे धुवत असलेल्या तीन महिलांपैकी इंतू चैनलाल मेश्राम (१९) ही तरुणी किरकोळ जखमी झाली.घटनास्थळी एकच गर्दी विमान कोसळल्याची माहिती लगतच्या गावकऱ्यांना कळताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. दरम्यान बिरसी विमानतळाचे संचालक राजा रेड्डी यांच्यासह दवनीवाडा ठाण्याचे पोलीस, तिरोडा ठाण्याचे पोलीस तसेच मध्यप्रदेश पोलीसही घटनास्थळी पोहोचले. गर्दीला आवरण्यासाठी गोंदियावरून शिघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. दिवसभर गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील लोकांची कोसळलेले विमान पाहण्यासाठी गर्दी कायम होती. दिल्लीचे चौकशी पथक रवानाया छोट्या विमानात ब्लॅक बॉक्स नसतो. त्यामुळे विमान अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी दिल्लीवरून तंत्रज्ञांना बोलविले आहे. ते येऊन तपासणी करेपर्यंत विमानाचे अवशेष नदीतून हलविता येणार नाही.- राजा रेड्डी

   
https://www.dailymotion.com/video/x844w7d