शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अष्टविनायकाचे दर्शन घडविणारे सुवर्ण मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 13:12 IST

बुलडाणा शहरातील गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेला प्रसिध्द सुवर्ण नगरातील सुवर्ण गणेश पंचक्रोशीत प्रसिध्द असून या ठिकाणी अष्टविनायकाचे दर्शन घडते.

हर्षनंदन वाघ 
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा : शहरातील गणेश भक्तांचे  आराध्य दैवत असलेला प्रसिध्द सुवर्ण नगरातील सुवर्ण गणेश पंचक्रोशीत प्रसिध्द असून या ठिकाणी अष्टविनायकाचे दर्शन घडते. त्यामुळे दररोज भाविकांची गर्दी दिसून येत असून गणेश उत्सवानिमित्त प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
सुवर्ण नगरातील काही युवकांनी एकत्र येऊन सार्वजनिक गणेशाची स्थापना करीत होते. १२ -१३ वर्षानंतर सुवर्ण नगरात गणेश मंदिर निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला.  तसा प्रस्ताव जागेचे मालक स्व.देवलाल वाणी यांच्यापुढे ठेवण्यात आला. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ११ व्यक्तींची कार्यकारिणी गठीत करून धर्मदाय आयुक्ताकडे संस्थेची नोंदणी करण्यात आली. तसेच सुवर्ण नगर परिसरातील नागरिक, व्यापारी यांनी वर्गणी गोळा करून मंदिर निर्माण कार्यास प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी साधे मंदिर बांधून जयपूर येथून सुमारे साडेचार फुटाच्या उंचीची आकर्षक व सुंदर अशी गणेश मुर्ती आणून १८ जून १९९१ रोजी मुर्तीची स्थापना करण्यात आली. कालांतराने शहर परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. शहरवासियांचे श्रध्देचे स्थान झाले. अनेक भाविकांचे नवस याठिकाणी पूर्ण झाल्याने नवस पूर्ण करणारा सुवर्ण गणेश म्हणून गणेशाची ओळख निर्माण झाली. भाविक भक्तांच्या भावनेचा आदर करून ७ वर्षापूर्वी या मंदिराचा जिर्णोध्दार करून अष्टविनायकाची स्थापना करण्यात आली. मात्र मंदिर परिसराची जागा लहान असल्यामुळे संस्थेचे  अनेक विस्तारीकरणाचे संकल्प पूर्ण झाले नाहीत. तरीही राजेंद्र पंजाबी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती सुरू असून प्रतिवर्षी गणेश उत्सव, स्थापना दिवस, पर्जंन्ययाग, चतुर्थी आदि कार्यक्रम येथे नियमित होतात.