शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

VIDEO : तोंडाला पाणी आणणारी 'गिल्ली मिसळ'

By admin | Updated: November 4, 2016 14:08 IST

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 4 - तेजतर्रार... गर्द लाल रंगाची ही मिसळ पाहून तोंडाला पाणी सुटले ना... ही मिसळ ...

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 4 - तेजतर्रार... गर्द लाल रंगाची ही मिसळ पाहून तोंडाला पाणी सुटले ना... ही मिसळ आहे अकोल्यातील उगवा या छोट्याशा गावातील. गेल्या पन्नास वर्षांपासून खवय्यांमध्ये ही मिसळ 'गिल्ली मिसळ' म्हणून प्रसिद्ध आहे. शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उगवा गावामध्ये सकाळी-सकाळी या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होते.
 
धीरज पटेल हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा तरुण या मिसळचे छोटेखानी फूड स्टॉल सध्या चालवत आहे. अकोलेकरांना या मिसळची चव मोठ्या प्रमाणात चाखता यावी, यासाठी धीरजने याचे फूड स्टॉल अकोला शहरातच सुरू केले आहे. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत ही स्वादिष्ट मिसळ अकोलेकरांना खायला मिळते, त्यानंतर धीरज कॉलेजसाठी जातो.
 
 
 

याचे वैशिष्ट्य म्हणजे मिसळसाठी लागणारा मसाला धीरज स्वतः घरीच बनवतो. त्यामुळे मिसळ आणि तर्रीची चव काही औरच असते. धीरजचे वडील बँकेमध्ये कर्मचारी असून आई गृहीण आहे. मात्र, सर्व पटेल कुटुंबच सध्या मिसळ बनवण्याच्या व्यवसायात गुंतले आहेत. केवळ सर्व सामान्य अकोलेकरच नाही तर येथील राजकारण्यांनाही 'गिल्ली मिसळ' खाण्याचा मोह आवरत नाही. अनेक जण तर मॉर्निंग वॉक केल्यानंतर उगव्याची ही गिल्ली मिसळ खाऊनच घरी जातात.