शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

Video: उन्हाळ्यात ‘अमृता"चे मोफत वाटप

By admin | Updated: May 24, 2017 20:41 IST

गिरीश राऊत / ऑनलाइन लोकमत खामगाव(बुलडाणा), दि. 24 - असह्य होणा-या उन्हाळ्यात आवश्यक वाटणा-या व शरीराला ‘अमृत’ ठरणा-या ताकाचे ...

गिरीश राऊत / ऑनलाइन लोकमत
खामगाव(बुलडाणा), दि. 24 - असह्य होणा-या उन्हाळ्यात आवश्यक वाटणा-या व शरीराला ‘अमृत’ ठरणा-या ताकाचे मोफत वाटप येथील मानकुंवरबेन लालचंदजी दोशी सार्वजनिक छांच वितरण या सेवाभावी संस्थेकडून उन्हाळाभर करण्यात येते. १९७६ साली हा उपक्रम सुरु करताना १० लिटर ताकाचे वाटप दरदिवशी करण्यात येत होते. मात्र गेल्या ३१ वर्षांत यामध्ये लाभार्थींच्या संख्येत वाढ झाल्याने हा आकडा आता ८०० लिटरवर पोहोचला आहे.
 
शहरातील रहिवासी मानकुंवरबेन लालचंदजी दोशी ह्या मध्य प्रदेशातील इंदोर येथे उन्हाळ्यात काही कामानिमित्त गेल्या असता तेथे मोफत ताक वाटपाचा उपक्रम राबविल्या जात असल्याचे त्यांना दिसून आले. याच प्रेरणेतून त्यांनी हा उपक्रम खामगाव येथे सुरु करण्याचे ठरविले व आपल्या परिने सुरुवातीला दररोज १० लिटर ताकाचे मोफत वितरण त्यांनी सन १९७६ साली सुरु केले होते.
 
यानंतर या उपक्रमाचे महत्व पाहता शहरातील इतर दानदाते सुध्दा या उपक्रमाशी जोडले गेले. आजरोजी या उपक्रमाला अखंडित ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. दुधाची टंचाई पाहता ताक वाटपात खंड पडू नये यासाठी संस्थेच्या पदाधिकाºयांकडून नामांकित कंपनीची दूध पावडर आणण्यात येवून दही लावल्या जाते व त्यानंतर ताक तयार करण्यात येते. उन्हाळ्यात वाढते तापमानात शरीराला ताकाची आवश्यकता असताना अशांसाठी हे मोफत ताक ‘अमृत’ समान ठरत आहे. आजरोजी मोफत ताक वितरणासाठी ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष महेंद्रभाई शहा, उपाध्यक्ष प्रफुल्लभाई कमानी, सचिव हसमुखभाई कमानी, कोषाध्यक्ष भिकुभाई संघराजका, सदस्य सर्वश्री नगीनभाई मेहता, जगदिशभाई संघराजका, अशोक कमानी, किर्तीभाई खिलोशिया, कपिलभाई दोशी, रतनलाल सुराणा, अ‍ॅड.व्हि.वाय.देशमुख आदींसोबतच नामदेवराव माने हे परिश्रम घेत आहेत. 
कायमस्वरुपी व्यवस्था-
३१ वर्षांपासून सुरु असलेला हा उपक्रम अखंडितपणे सुरु राहावा, यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था म्हणून दानदात्यांकडून प्राप्त झालेला मदतनिधी बँकेमध्ये डिपॉझिट करण्यात आला आहे. यावर मिळणाºया व्याजातून हा खर्च भागविल्या जातो. मात्र दरवर्षी लाभार्थी संख्या वाढतीच आहे.
 

https://www.dailymotion.com/video/x844zgx