शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: बिबट्याचा गावात मुक्तसंचार

By admin | Updated: August 13, 2016 19:29 IST

तीन महिन्यापुर्वी तालुक्यातील वडी शिवारातील राष्ट्रीय महामार्गाला लागुन असलेल्या पाईप फॅक्टरी परिसरात बिबट्याच्या मुक्त संचार असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे

- सुहास वाघमारे / ऑनलाइन लोकमत
तीन महीन्यांपासून पाईप फॅक्टरीत दर्शन
नांदुरा (जि.बुलडाणा), दि. 13 - तीन महिन्यापुर्वी तालुक्यातील वडी शिवारातील राष्ट्रीय महामार्गाला लागुन असलेल्या पाईप फॅक्टरी परिसरात बिबट्याच्या मुक्त संचार असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच  जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.
 
यावर्षी ८ मे व ३ जून दरम्यान वडी शिवारातील पाईप फॅक्टरी परिसरात बिबट्या दिसून आल्याने फॅक्टरी परिसरातील मजूर व शेतकरी यांच्यात दहशत निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने  फोटोसह बातमी प्रकाशित केल्यानंतर वनविभागाचा चमु येथे दाखल झाली. प्रत्येकवेळी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न वनविभागाने केला. मात्र, काही दिवसातच बिबट्याने परिसर सोडला असे सांगुन वनविभागाच्या कर्मचाºयांनी त्यांची कार्यवाही थांबवली. 
 
दरम्यान, आता गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार पाईप फॅक्टरी परिसरातील शेतात व फॅक्टरी परिसरातील शेतात व फॅक्टरीत आहे. हा बिबट्या शेतकºयांना दिसुन आल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले. यामधील काही शेतकºयांनी नगरसेवक सचिन नांदुरकर व अनिल सपकाळ यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ फॅक्टरी परिसरात जावुन पाहणी केली असता पुर्वीप्रमाणे बिबट्या हा पाईप फॅक्टरीतील पाईपवर बसलेला दिसून आला. नगरसेवक अनिल सपकाळ यांनी बिबट्याचा मुक्त संचार कॅमेराबंद केला व व्हिडीओ चित्रीकरण केले.  
 
मागील तीन महिन्यांपासून बिबट्याचा परिसरात मुक्तसंचार असून परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहे. या बिबट्याला वनविभागाने पकडून जंगलात सोडावे, अशी परिसरातील शेतकºयांची आहे.
 
वनविभागाला दिसेना बिबट्या!
पाईप फॅक्टरी परिसरातील बिबट्याचा मुक्तसंचार शेतकºयांना दिसतो. त्याचे छायाचित्र व आता तर व्हिडीओ सुध्दा उपलब्ध आहे. मात्र वनविभागाचे कर्मचारी यांना दिसतच नाही. त्यामुळे वनविभागाची अनास्था वारंवार समोर येत आहे. 
 
ही पिकनिक जीवावर बेतणारी !
बिबट्या पाईप फॅक्टरी परिसरातील मुक्तसंचार हा नांदुरा शहरातील वन्यजीव प्रेमी व पर्यावरण प्रेमींसाठी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. दररोज बिबट्याला पाहण्यासाठी काही तरूण धाडस करून पाईप फॅक्टरी परिसर पिंजून काढतात. जिवंत बिबट्या पाहण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीय पार्कमध्ये जाण्याची गरज नाही. ‘कशाला जाता तडोबा..’ आता मेसेज यापुर्वीच सोशल मिडीयात परिसरात व्हायरल झाला होता. मात्र चिडलेल्या बिबट्याने हल्ला केला. तर ही पिकनिक जीवावर बेतणारी ठरू शकते.