शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - रंगभूमीवरील योगदानासाठी फिरोज खान यांना "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार

By admin | Updated: April 11, 2017 23:10 IST

फिरोज खान यांना रंगभूमीवरील योगदानासाठी "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार देण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - ‘मुगल ए आजम’ हे नाटक धाडसाने रंगमंचावर आणून नाट्यरसिकांना त्या प्रेमकथेच्या जिवंतपणाचा भव्य साक्षात्कार घडवणारे फिरोज खान यांना रंगभूमीवरील योगदानासाठी "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार देण्यात आला आहे. "झी मराठी" न्यूज चॅनेलचे संपादक उदय निरगुडकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
 
रंगभूमी (पुरुष) विभागात फिरोज खान यांच्यासोबत भाऊ कदम, संतोष पवार, सिद्धार्थ जाधव आणि प्रशांत दामले यांचाही नामांकन यादीत समावेश होता. मात्र फिरोज खान यांनी बाजी मारली असून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. 
 
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
(लोकमत "महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर" पुरस्कार सोहळ्याला दिमाखात सुरुवात)
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर
facebook.com/lokmat
 
फिरोज खान यांच्या कार्याचा आढावा- 
सिनेरसिकांना मोहीत करणारी प्रेमकथा असलेला ‘मुगल ए आजम’ सिनेमा. १९६० च्या दशकात गाजलेल्या चित्रपटाची गाणी आजही अजरामर आहेत. याच कथेवर आधारित फिरोज खान यांनी ‘मुगल ए आजम’ हे नाटक धाडसाने रंगमंचावर आणले आणि नाट्यरसिकांना त्या प्रेमकथेच्या जिवंतपणाचा भव्य साक्षात्कार घडवला. अनेक चित्रपटांद्वारे दिग्दर्शकीय कौशल्याने फिरोज खान यांनी आपली वेगळी ओळख मिळविली आहेच, पण रंगमंचावर पहिले प्रेम असणा-या दिग्दर्शकाने ‘तुम्हारी अमृता’, ‘सेल्समैन रामलाल’, ‘महात्मा वर्सेस गांधी’ ही नाटके रंगमंचावर आणून, नाट्यरसिकांना आपली वेगळी ओळख दिली आहे. आता त्यांचे ‘मुगल ए आजम’ नाटक रसिकाश्रय मिळवते आहे. चित्रपटाची निर्मिती ही चिरकाल टिकणारी असली, तरी नाटकातल्या जिवंत अभिनयाची जादू काही वेगळीच असते. मराठी रंगभूमीवर अनेक गाजलेल्या नाटकांचे माध्यमांतर चित्रपटात होत असतानाच, हिंदीभाषक प्रसिद्ध सिने-नाट्यदिग्दर्शक फिरोज खान यांनी मात्र, गाजलेल्या चित्रपटाचा आधार घेऊन, त्यावर नाट्याविष्कार सादर करण्याचा नवा ट्रेंड रंगभूमीवर आणला. त्यांच्या या प्रयत्नांचा गौरव होत आहे. १९६०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत एक अजरामर कलाकृती निर्मिली गेली. त्या कलाकृतीचे गारुड आज ५० वर्षांनंतर कायम असतानाच, त्याचा नाट्याविष्कारात रूपांतरित करण्याचे धाडस एखादा नाट्यवेडाच करू शकतो. सादरीकरणाची माध्यमे वेगळी असली, तरी चित्रपटात बघितलेली प्रेमकथा नाटकात बघताना रसिक त्याची तुलना करणारच, याची जाणीव फिरोज खान यांना आहेच, पण चित्रपट आणि रंगमंच या दोन माध्यमांचे बलस्थाने वेगवेगळी आहेत. चित्रपटगृहात कलावतांना लगेच प्रेक्षकांची दाद मिळवता येत नाही. रंगमंचीय कलाकृतीचा प्रभाव हा कायमच रसिकांच्या मनावर कोरला जात असतो, याचाच साक्षात्कार त्यांनी ‘मुगल ए आजम’ या नाटकाद्वारे सिद्ध केला आहे. या नाटकाची गोष्ट पुरातन असल्याने, त्यातील व्यक्तिरेखांची वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य याचा बारकाईने अभ्यास करून, फिरोज खान यांनी त्यांच्या ३०-३५ वर्षांच्या रंगभूमीवरील अनुभवाच्या बळावर ही देखणी कलाकृती नाट्यरसिकांसाठी आविष्कृत केली. या आविष्काराला सिनेसृष्टीतील दिग्गजांसह रंगभूमीच्या अभ्यासकांनीही गौरवले आहे. ‘मुगल ए आझम’मधील अजरामर गाणी, प्रेमकथेतील संघर्ष रंगमंचावर सादर करताना, त्यातला जिवंतपणा नेमकेपणाने टिपला आहे. नृत्याविष्काराचा साजशृंगार करून ही कलाकृती नाट्यदरबारात रसिकांपुढे सादर केली. ‘मुगल ए आजम’ या इतिहास रचणा-या चित्रपटाप्रमाणेच हा नाट्याविष्कारही रंगभूमीवरचा ऐतिहासिक कलाविष्कार ठरला आहे.
 
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा -
 
http://lmoty.lokmat.com/vote.php