शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या नागपूरमधील घरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 15:04 IST

ऑनलाइन लोकमत   नागपूर, दि. 18 - भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. सोमवारी ...

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 18 - भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. सोमवारी (17 जुलै ) संध्याकाळी नागपुरातील शंकरनगर परिसरातील राहत्या घरात चोरीचा प्रकार घडला. येथील चौथ्या मजल्यावर उमेश यादवचं घर आहे. घरात कुणीही  नाही याची संधी साधून चोरांनी जवळपास 1 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
महत्त्वाचे म्हणजे चोरीची घटना घडली त्यावेळी उमेश यादव नागपुरातच होता. पण यावेळी कुटुंबीयांसोबत पार्टीसाठी बाहेर गेला होता. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे सर्वांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवण्यात आली. 
 
तर दुसरीकडे,  भारतीय क्रिकेट टीममधीलच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला शिवीगाळ करण्यात आली असून त्याला घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. याप्रकरणी मोहम्मद शमीनं कोलकातामध्ये चार जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. 
 
 
टेलिग्राफनं दिलेल्या वृत्तानुसार, चार जणांनी शिवीगाळ केली आणि बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा आरोप शमीनं केला. याबाबत त्यानं पोलिसात तक्रारही नोंदवली.  घडल्या प्रकाराबाबत तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं एका व्यक्तीची ओळख पटवून अन्य तीन जणांनाही ताब्यात घेतले. यातील तीन जणांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. 
 
शमीनं घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, शनिवारी (15 जुलै ) रात्री कार पार्किंगदरम्यान एका व्यक्तीसोबत त्याचा वाद झाला. यावरुन संबंधित व्यक्तीनं शमीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यानं शमीला अशीही धमकी दिली की, जर गाडीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केलास तर तुला (शमीला) धडा शिकवेन.
 दरम्यान, या घटनेनंतर शमीनं त्याच्यासोबत कुटुंबालाही पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
 
https://www.dailymotion.com/video/x8458d7