शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : शेतजमिनीसाठी शेतकऱ्याचे शोलेस्टाईल आंदोलन

By admin | Updated: June 20, 2017 18:45 IST

ऑनलाइन लोकमत  उस्मानाबाद, दि. 20 - वाशी तालुक्यातील वडजी येथील एका ७५ वर्षीय शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील झाडावर ...

ऑनलाइन लोकमत उस्मानाबाद, दि. 20 - वाशी तालुक्यातील वडजी येथील एका ७५ वर्षीय शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील झाडावर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले़ साधारणत: अर्धा ते पाऊण तास झाडावर थांबलेल्या शेतकऱ्याने प्रशासनाच्या कारभारावर राग व्यक्त करीत सातबारा दुरूस्त करून न्यायालयाच्या निकालाप्रमाणे शेती नावावर करून देण्याची मागणी केली़.वाशी तालुक्यातील वडजी येथील शेतकरी माणिक विश्वनाथ मोराळे (७५, ह़मु़ देवळाली ढो़ ताक़ळंब) यांच्या वडिलांच्या नावे वडिलोपार्जित जमीन आहे़ मात्र, गावातील गावगुंडांनी तत्कालीन तलाठी व इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून सातबाऱ्यावरील आपले नाव कमी करून स्वत:चे नाव लावल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याने केला आहे़ या प्रकरणात प्रशासन दप्तरी, न्यायालयीन प्रकरणात खेटे मारून थकलेल्या शेतकऱ्याने अखेर आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला होता़ प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे शेतकरी माणिक मोराळे हे मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले़ कार्यालयाच्या प्रवेशद्वारातील एका झाडावर चढून त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला़ घटनास्थळी आलेले सपोनि दिगंबर शिंदे, हातमोडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत काढली़ त्यावेळी संबंधित शेतकऱ्याने आपली व्यथा मांडून प्रशासनावरील राग व्यक्त केला़ शेताच्या सातबाऱ्यावर बेकायदेशीर झालेला फेरफार दुरूस्त करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली़ उपस्थित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करा, न्याय मिळेल, असे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी झाडावरून खाली उतरून अधिकाऱ्यांशी संवाद साधला़.न्यायालयात पाठपुरावा कराझाडावरून उतरलेले शेतकरी मोराळे यांच्याशी ़अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी संवाद साधला़ कार्यालयीन प्रकरणे निकाली निघाले असले तरी उच्च न्यायालयात सुरू असलेले एक प्रकरण निकाली निघणे गरजेचे आहे़ आपण न्यायालयात सातत्याने लढा दिला आहे़ शेवटच्या टप्प्यात हे प्रकरण असल्याने तुम्ही लढा द्या, तुमच्या बाजूने निकाल लागेल, असा सल्लाही दिला़ शिवाय न्यायालयात प्रकरण असल्याने आत्महत्येसारखा मार्ग अवलंबू नका, असेही ते म्हणाले़.