शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- दोन वर्षांत सर्व गरिबांना हक्काची घरे देणार- मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 16:47 IST

ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याचे स्वप्न पाहिले ...

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याचे स्वप्न पाहिले आहे. मात्र राज्य शासन २०१९ पर्यंत सर्व गरिबांना हक्काची घरे देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसावद (ता.जळगाव) येथील प्रचार सभेत सांगितले. यावेळी त्यांनी शासनाकडून, शिक्षण, रोजगार, कृषी यासह विविध क्षेत्रासाठी राबविलेल्या योजनांचा लेखाजोखा सादर केला.जळगाव जिल्ह्यातील म्हसावद-बोरनार गटातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, खासदार ए. टी. पाटील यांच्यासह आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू असलेल्या टीकेला मुख्यमंत्री जळगावच्या सभेत उत्तर देतील तसेच सेनेच्या मंत्र्यांनी बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर घेतलेल्या भेटीबाबत ते बोलतील अशी अपेक्षा होती मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात चकार शब्दही काढला नाही. ते म्हणाले, सध्या मी किती पाणी पितो याकडे अनेकांचे लक्ष असते. मी त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत विरोधकांना टोला हाणला. ७० वर्षानंतरही मुलभूत समस्या कायममुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण राज्यात फिरत असताना ७० वर्षानंतरही अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत समस्या ग्रामीण भागात कायम आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना वीज मिळाली नाही. त्यामुळे शेतात पाणी असून देखील पिकांना पाणी देता आले नाही.शेतकऱ्यांना ८ हजार कोटींची थेट मदतकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आम्हाला विचारतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी काय केले? आम्ही दोन वर्षांपूर्वी सत्तेत आलो मात्र तुमच्या ५० वर्षातील नाकर्तेपणामुळे आज शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे. आम्ही शेतकऱ्यांना ८ हजार कोटी रुपयांची थेट मदत दिली.जलयुक्त शिवारमुळे ४ हजार गावे दुष्काळमुक्तराज्यातील २० हजार गावांमध्ये मानवनिर्मित दुष्काळीस्थितीत आहेत. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवार योजना आणली. पावसाचे पाणी आपल्याच गावात अडविण्यावर आम्ही भर दिल्याने आतापर्यंत ४ हजार गावेदुष्काळमुक्त झाली आहे. या पावसाळ्यानंतर ११ हजार गावांमधील दुष्काळ संपणार असल्याचे त्यांनी सांगितले.१२ लाख हेक्टरवर संरक्षित सिंचन क्षेत्रआघाडी शासनाने कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही दुष्काळीस्थिती कायम राहिली. दुष्काळमुक्तीसाठी आम्ही ३ हजार कोटी तर ५०० कोटींची रक्कम ही लोकसहभागातून उभी केल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अंतर्गत पाणी अडविल्यामुळे आज १२ लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र तयार करण्यात आम्हाला यश आले.

https://www.dailymotion.com/video/x844qst