शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - धुळ्यात मनोरुग्णाने पोलिसांची व्हॅन पेटविली

By admin | Updated: December 23, 2016 21:48 IST

ऑनलाइन लोकमत धुळे, दि.23 -  जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात उभी असलेली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची सुमो मनोरुग्ण ...

ऑनलाइन लोकमतधुळे, दि.23 -  जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात उभी असलेली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची सुमो मनोरुग्ण मनीष भोरसकर (वय ४०) याने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास घडली. गाडी पेटविल्यानंतर तेथून पळत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच्या बाजूस दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची एमएच १८-अ‍ेफ ०१६२ या क्रमांकाची सुमो उभी होती. याकाळात आवारात आलेल्या मनिष पुरूषोत्तम भोरसकर (वय ४० रा़शिवकुंज बिल्डींग, भिडे बाग, देवपूर, धुळे) याने बाटलीत आणलेले पेट्रोल गाडीवर टाकून काडीपेटीने ती पेटवून दिली. पेट्रोलमुळे काही सेंकदात एकदम आगीचा भडका उडाल्याने एकच धावपळ उडाली. यठिकाणी उपस्थित असलेले सहायक उपनिरीक्षक रमेश पवार व जिल्हा विशेष शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संदेश कुलकर्णी यांनी बाहेर धाव घेतली. त्यावेळी मनिष भोरसकर तेथून पळतांना दिसला. त्याला रमेश पवार यांनी ताब्यात घेतले. तर संदेश कुलकर्णीसह इतर कर्मचाऱ्यांनी आवारातील बोअरींग सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्नीशमन दलाच्या बंबालाही पाचारण करण्यात आले. बंब आल्यानंतर दहा मिनिटात आगेवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तोपर्यंत लॉगबुक, मंथली बुकसह सर्व गाडी जळून खाक झाली होती. त्यात ३ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़ याबाबत चालक विलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मनिष भोरसकर याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात अग्नीउपद्रव व शासकीय वाहन जाळल्याप्रकरणी भादंवी कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

मनिष मानसिकदृष्या आजारीसंशयित मनिष भोरसकर याची मानसिक स्थिती चांगली नाही. त्यावर नाशिक व पुणे येथील डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत. याबाबत त्याचा चुलत भाऊ राहुल भोेरसकर याने पोलिसांना माहिती दिली. त्याच्यावर उपचार सुरू असल्याबाबतचे वैद्यकीय कागदपत्रही पोलिसांना दाखविली. मात्र याबाबत शासकीय वैद्यकीय सूत्रांचा सल्ला घेऊन त्याबाबत पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

घरी होता एकटामनिष याचे आई- वडील शुक्रवारी घरभरणीच्या कार्यक्रमासाठी शहादा येथे गेले होते़ त्यामुळे तो घरी एकटा होता़ त्याने काही दिवस वडापावची गाडीही लावली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

विरोध, नाराजीतून जाळली गाडीमनिष हा मला कॉमन मॅन पॅकेज मिळत नाही़ दहा वर्षापासुन अर्जफाटे करत होता़ राजकीय लोक विरोध करतात याचा राग आला म्हणून गाडी जाळली असे त्याने पोलिसांनाही सांगितले़ त्याची पोलीस प्रशासनाबाबत तक्रार नव्हती़ तक्रार असेल तर त्याची माहिती घेण्यात येईल़ असे पोलीस अधीक्षक चैतन्या एस यांनी सांगितले़

https://www.dailymotion.com/video/x844m9w