शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- सांस्कृतिक सभागृह बनले सार्वजनिक शौचालय

By admin | Updated: December 27, 2016 18:42 IST

ऑनलाइन लोकमत चंद्रपूर, दि. 27 - एकीकडे शासन गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष योजना राबवित आहे. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सावली ...

ऑनलाइन लोकमतचंद्रपूर, दि. 27 - एकीकडे शासन गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष योजना राबवित आहे. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सावली येथील चंद्रपूर-गडचिरोली या मुख्य मार्गावर असलेल्या सांस्कृतिक भवनाला सार्वजनिक शौचालयाचे रूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शासनाच्या गाव हागणदारी मुक्त करण्याच्या योजनेचा बट्ट्याभोळ झाल्याचे दिसून येत आहे.सावली येथे सन १९९९ साली माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या खासदार निधींतर्गत सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम नऊ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आले. गावातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सदर सभागृहाचे बांधकाम करण्यात आले होते. त्या माध्यमातून शासनाला राजस्वसुद्धा प्राप्त होणार होते. या सभागृहाला लागूनच दोन बाजूला दोन खोल्या, इलेक्ट्रिकची व्यवस्था, सिलिंग फॅन इत्यादी सोयी-सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या सांस्कृतिक भवनाला घरघर लागली आहे. भवनाच्या एका बाजूला सार्वजनिक मूत्रीघर आहे. मागील बाजूस शेती आहे, तर बाजूला मोकळी जागा आहे. या परिसरात आजूबाजूला कुठेही कचराकुंडी नसल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. बाजूला मोकळी जागा असल्याने अनेक जण तेथे शौचास जातात. सभागृहाचा वाली कुणी नसल्याने चोरट्यांनी सभागृहाचे दरवाजे तोडून येथील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू, सिलिंग फॅन लंपास केले. कालांतराने नागरिकांनी सभागृहातच जाऊन शौच करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदर सभागृहाला सार्वजनिक शौचालयाचे रूप आलेले आहे. सदर सभागृहाची देखभाल पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाकडे होती. त्यानंतर ते तहसील कार्यलयाकडे हस्तांतरीत करण्यात आले. तहसील कार्यालयाने स्पंदन या संस्थेला सभागृह हस्तांतरीत केले. स्पंदन या संस्थेतर्फे त्या सभागृहात व्यायामशाळा सुरू करण्यात येणार होती. मात्र त्यांना विरोध करण्यात आला. त्यामुळे पुन्हा त्यांची देखभाल तहसील कार्यालयाकडे आली. मात्र आजपर्यंतच्या एकही तहसीलदारांनी त्याकडे लक्ष दिले नाही. किंवा एकही पाहरेकरी नेमला नाही. त्यामुळे सदर सभागृह रामभरोसे आहे. रुमाल बांधून मतदानसदर सभागृहाची तात्पुरती साफसफाई करून लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात येत होती. यावेळी मतदार तथा अधिकारी नाकावर रुमाल बांधून मतदान करीत होते. मात्र काही कालवधीनंतर ते मतदान केंद्रही रद्द करण्यात आले. सभागृहातील साहित्य लंपास सदर सभागृहामध्ये इलेक्टिक फिटिंग करून सिलिंग फॅन व विजेची सोय केली होती. या सभागृहामध्ये २० च्या जवळपास सिलिंग फॅन लावण्यात आले होते. मात्र या सभागृहाचा रखवाला कुणीही नसल्यामुळे चोरट्यांनी सभागृहातील सिलिंग फॅन व वीज बल्ब लंपास केले. यासंदर्भात तहसीलदार डी.एस. भोयर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, आप तहसीलदारपदाचा नव्यानेच पदभार स्वीकारला आहे. यामुळे या संदर्भात पूर्ण माहिती जाणून घेऊ. त्या सभागृहाला संरक्षण भिंत नसल्यामुळे कोणीही सहज आत प्रवेश करू शकतो. त्यामुळे त्या सभागृहाला संरक्षण भिंतीच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.

https://www.dailymotion.com/video/x844mlv