शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसची निदर्शनं

By admin | Updated: June 9, 2017 13:26 IST

ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 9 -  मध्य प्रदेशात पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मंदसौरकडे जात असताना गुरुवारी ...

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 9 -  मध्य प्रदेशात पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मंदसौरकडे जात असताना गुरुवारी (8 जून ) काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पाच तासांनंतर सुटका करण्यात आली.
 
राहुल गांधींविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 
 
गोळीबार करुन खून करणा-या, महाराष्ट्रातील शेतकरी व जनताविरोधी भाजपा सरकारचा निषेधार्थ आंदोलन,अशा आशयाचे फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.  
 
दरम्यान, श्रीमंतांचे १.५० लाख कोटींचे कर्ज मोदी माफ करू शकतात; पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकत नाहीत. शेतमालाला योग्य दर देऊ शकत नाहीत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि बोनस देऊ शकत नाहीत. ते शेतकऱ्यांना फक्त गोळ्या देऊ शकतात, अशी टीका गुरुवारी राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशात असताना केली होती. 
(राहुल गांधी यांना अटक)
निमच येथून पुढे गेल्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखले. या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय जवान, जय किसान’, ‘राहुल गांधी जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. राहुल गांधी यांच्यासह राजस्थान काँग्रेसचे प्रमुख सचिन पायलट, आमदार जयवर्धन सिंह आणि शेकडो कार्यकर्त्यांना या वेळी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना एका गेस्टहाउसमध्ये नेले.
(पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू)
राहुल यांच्यासोबत ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह व कमलनाथ हेही होते. राजस्थानच्या चित्तोडगढ जिल्ह्यातील दलिया गावातून मध्य प्रदेशमध्ये चालून प्रवेश केला. मध्य प्रदेशात प्रवेशापूर्वी राहुल गांधी हे चित्तोडगढ जिल्ह्यात निम्बाहेडपासून पाच ते सात किमी मोटारसायकलवरून गेले. सोबत २ हजार लोक, १५० वाहने होती. 
 
- शेतकऱ्यांच्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान जबाबदार आहेत.- राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष

https://www.dailymotion.com/video/x8452rf