शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- नाताळ उत्साहात साजरा

By admin | Updated: December 25, 2016 18:54 IST

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 25 - सामूहिक प्रार्थना, पवित्र संदेशाचे श्रवण अशा पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच परस्परांना हॅपी ख्रिसमस, मेरी ख्रिसमसच्या ...

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 25 - सामूहिक प्रार्थना, पवित्र संदेशाचे श्रवण अशा पारंपरिक कार्यक्रमांबरोबरच परस्परांना हॅपी ख्रिसमस, मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा, केक व भेटवस्तूंची देवाण-घेवाण, मिष्टान्नाचा आस्वाद अशा आनंदी वातावरणात ख्रिस्तजन्माचा सोहळा; अर्थात नाताळचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला.येशू ख्रिस्तांच्या जन्माचा दिवस या दृष्टीने ख्रिस्त धर्मीयांसाठी नाताळचे महत्त्व अनन्यासाधारण असे आहे. नाताळनिमित्त रविवार २५ डिसेंबर रोजी शहरातील सर्व चर्चमध्ये पारंपरिक पद्धतीने प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या. त्यानंतर उपस्थितांना धर्मगुरूंनी शांती, एकता, सामाजिक सलोखा, सेवा यांचा संदेश दिला. प्रार्थना सभा व उपासनाख्रिस्तजन्मानिमित्त रविवारी सकाळी १0 वाजता गांधी मार्गावरील अलायन्स मातृ चर्च, मध्यवर्ती बस्थानकाजवळील आॅल सेंट चर्च, सिंधी कॅम्पमधील बेथेल अलायन्स चर्च, बलोदे लेआऊटमधील सेव्हन्थ डे अ‍ॅडव्हॅन्टीस चर्च, ख्रिश्न कॉलनीतील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्च, अलायन्स कॉन्फरन्स सेंटर, अलायन्स लायब्ररी, माउंट कारमेलमधील रोमन कॅथॉलिक चर्च, न्यू इंडिया चर्च आॅफ गॉड, दि इंडियन पेन्टी कॉस्टल चर्चसह इतर चर्चमधून प्रार्थना सभांचे, तसेच उपासनेचे आयोजन करण्यात आले होते. अलायन्स मातृ चर्चमध्ये पार पडलेल्या उपासनेदरम्यान ख्रिस्त बांधवांनी सहकुटुंब व वैयक्तिक गीते सादर करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद साजरा केला. यामध्ये लहान बालकांनी सादर केलेल्या गीताने वातावरण चैतन्यमय झाले होते. सभेला उपस्थित मंडळी सहकुटुंब, तसेच नवे कपडे परिधान करून चर्चमध्ये आल्याचे दिसत होते. प्रार्थनेनंतर परस्परांना शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू होती. एकमेकांना भेटल्याचा आणि सणाचा आनंद सर्वाच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी शुभेच्छांबरोबरच केक आणि बालचमूंसाठी चॉकलेट व मिठाई वितरित करण्यात आली. नाताळची शुभेच्छा पत्रे, सांताक्लॉजच्या लाल आकर्षक टोप्या, लाल अंगरखा, सांतासारख्या पांढऱ्या शुभ्र दाढी-मिशा, तसेच चॉकलेट, मेणबत्त्या, भेटीच्या वस्तू, फुगे, झिरमिळ्या, ख्रिसमस-ट्री आदी वस्तूंमुळे वातावरण चैतन्यमय झाले होते. नाताळनिमित्त अलायन्स चर्च लायब्ररीसमोर व मध्यवर्ती बसस्थानकाजवळील आॅल सेंट चर्चमध्ये साकारण्यात आलेले ख्रिस्तजन्म सोहळ्याचे देखावे सर्वांना आकर्षित करीत होते.

https://www.dailymotion.com/video/x844mfb