शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ‘चुलीवरच्या भाकरी’नं दिला ४ हजार महिलांना रोजगार!

By admin | Updated: September 22, 2016 08:53 IST

पुन्हा एकदा घरच्या चुलीवरच्या भाकरीची क्रेझ सुरू झाली असून त्यामुळे हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे.

सचिन जवळकोटे, आॅनलाईन लोकमत

सातारा, दि. २२ -  ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ असं म्हणत पूर्वीच्या काळी मंडळी पंजाबी डिशेसची चव चाखायला हॉटेलात जायची. काळ बदलला. टेस्ट बदलली. आता पुन्हा एकदा घरच्या चुलीवरच्या भाकरीची क्रेझ सुरू झालीय. अस्सल गावरान खर्डा- भाकरी जेवणाचा फर्डाऽऽ बेत गावोगावच्या ढाब्यांवर रंगू लागलाय. यामुळं ‘तंदूर रोटी’ला किती फटका बसला माहीत नाही; परंतु हजारो महिलांच्या हातांना मात्र कायमस्वरुपी काम मिळालंय. होय. केवळ सातारा जिल्ह्यातच एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार हजार माता-भगिनींना या खरपूस भाकरीमुळं भरघोस रोजगार मिळालाय.आज पावेतो ‘भाकरीचा चंद्र’ साहित्यात चमकला. ‘आधी हाताला चटके देणारी भाकर’ही बहिणाबार्इंच्या कवितेतून प्रकटली. ‘चतकोर भाकरी'चं उद्रेकी काव्यही उपाशी पोटी जन्माला आलं. ‘न फिरवल्यामुळे भाकरी कशी करपते,’ हे बारामतीकरांच्या भाषणातून सत्ता बदलापूर्वी राजकीय तज्ज्ञांना अनेकवेळा समजलं; पंरतु प्रत्यक्ष जीवनातून मात्र ही भाकरी हद्दपार होत गेली. ‘इस्टंट पोळी’च्या युगात ‘पिठाची बडवा-बडवी’ पुरती कालबाह्य झाली. अशातच मराठी खवय्याला ‘पंजाबी डिशेस’ अन् ‘गुजराथी थाळी’ची ओढ लागली. गेल्या दोन-तीन दशकात ‘नॉर्थ अन् साऊथ इंडियन टेस्ट’नं हॉटेलच्या काऊंटरवर अधिराज्य केलं. मात्र गेल्या काही वर्षापासून ही टेस्ट पुन्हा झपाट्यानं बदलत गेलीय. ‘भाकरी कशाशी खातात,’ हे माहीत नसणारी नवीन पिढी अस्सल गावरान जेवण अनुभवण्यासाठी आसुसलीय, हे ओळखून गावोगावच्या ढाब्यांवर ‘तंदूर भट्टी’ नजीकच ‘मराठमोळी  चूल’ मोठ्या कौतुकानं बांधली गेलीय. सातारा जिल्हा तर पर्यटनाचा बालेकिल्ला. महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, तापोळा, कास पठार अन् कोयना धरणासह असंख्य पर्यटनस्थळं हजारो पर्यटकांनी गजबजून गेलली. या पट्टयात वळणावळणावर ढाबे अन् हॉटेल्सची संख्या चिक्कार. खवय्यांची गर्दीही तुडुंब.   ‘पुणे-बेंगलोर हायवे’वर तर जागोजागी हॉटेल्सच्या फलकांची जाहिरातबाजी; पण यातल्या बहुसंख्य होर्डिंग्जवर एखाद्या हिरोईनच्या थाटात एका आज्जीबाईचा भलामोठ्ठा फोटो. 'कॅतरीनाचा कैफ'ही कमी पडावा... 'करिनाची क्रेझ'ही कमी वाटावी, अशा पोझमध्ये फ्लेक्सवर झळकणारी ही आज्जीबाई चक्क चुलीच्या धुरात भाकऱ्या थापताना दिसते. 'फूड मॉल'च्या पब्लिसिटीसाठी इरकल साडीतल्या सर्वसामान्य खेडवळ बाईचा वापर होण्याची ही अजब घटना म्हणजे बदलत्या युगाची नांदीच !  विशेष म्हणजे, अशा आजीबाईसारख्याच हजारो महिला आजकाल प्रत्यक्षात ढाबा-ढाब्यांवर भाकरी थापताना दिसताहेत. वाईतील एका ढाब्यावरच्या किचनमध्ये भाकरी बडविणारी गौराबाई सांगत होती, ‘येका तासामंदी म्या तीस भाकऱ्या बडवित्ये; पण भाईरुन म्हंजी मालकाच्या काऊंटरवरनं मोठी आर्डर आली तर मातूर माजा स्पीड वाढतूया. येका टायमाला शंभर-शंभर भाकऱ्याबी बडवुनशान म्या दिल्याती.’ बोलताना गौराबाईचा हात सराईतपणे पिठाच्या गोळ्यावरून झरझर फिरत होता. एकाचवेळी एकीकडं भाकरी थापणं तर दुसरीकडं तव्यावर भाजणं, असा ‘टू इन वन’ प्रोग्राम व्यवस्थितपणे सुरू होता.

  साताऱ्यातील हॉटेल चालक तुषांत माने यांनी दिलेली माहिती तर आश्चर्यकारकच होती, ‘पूर्वी दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर उन्हातान्हात मजुरी करणाऱ्या महिलांना आता या भाकरीमुळं बसल्याजागी चांगलाच रोजगार मिळालाय. महिन्याकाठी पाच ते सहा हजार रुपयांचा पगार मिळतोय. पुन्हा वर हक्काची साप्ताहिक सुट्टी. दिवसभरात आठ तास काम केलं की थेट घरी.’  पूर्वी ‘पंजाबी डिश’ संस्कृतीत ‘वस्ताद’ या पुरुषी व्यक्तीमत्वावरच हॉटेलिंगचा व्यवसाय अवलंबून असायचा; परंतु चुलीवरच्या भाकरीचं 'धूम्र युग' परत अवतरल्यानंतर आतल्या भट्ट्यांवर आता ताई-माई-आक्का यांची पुन्हा वर्दळ वाढलीय. सातारा जिल्ह्यातील किमान दीड हजार हॉटेल्स्मध्ये आज भाकऱ्या भाजणाऱ्या महिलांना रोजचा रोजगार मिळालाय. या महिलांची संख्या थोडीथोडकी नव्हे तर चार हजारांच्या आसपास पोहोचलीय. यातल्या बहुतांश अशिक्षित अन् वयस्कर, तरीही भाकऱ्या थापण्याच्या ‘स्कील मॅनेजमेंट’मध्ये माहीर.  .. तर अशी ही भाकरी. कुणाला बाजरीची आवडते तर कुणाला नाचणीची. तरीही खरी भाकरी ही ज्वारीचीच. भाकरी खरं तर गॅसवरही तयार होऊ शकणारी; परंतु धगधगत्या चुलीवरच्या गरमागरम तव्यावर भाजली जाणारी भाकरी काही औरच. तिचा खरपूस वास नाकात शिरल्यानंतरही भूक नाही लागली तर आई शपथ. भाकरी थापण्याचंही एक खास तंत्र असतं. चारही बाजूनं बड-बडवून गोलाकार बनल्यानंतर भाकरी तव्यावर पडते, तेव्हा त्याला नेमकं पाणी लावण्याचंही ‘टायमिंग’ जमायला हवं. भाकरी जेवढी पातळ होईल, तेवढी टम्म फुगण्याचे चान्सेस अधिक़ त्यात पुन्हा ती सतत फिरवायलाही हवी, नाहीतर करपलीच समजा. मात्र अनेकांना ही करपलेली भाकरीही खूप आवडते बरं का. तर मग मंडळी.. कधी निघणार बाहेर? अस्सल चुलीवरची खर्डा-भाकरी खायला?

(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)