शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- नवरदेवाप्रमाणेच नवरीची वरात मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 22:49 IST

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 8 - लग्नाच्या आदल्यादिवशी नवरदेवाची वरात मिरवणूक निघत असते हे आपण पाहिलेले व ऐकलेले आहे. ...

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 8 - लग्नाच्या आदल्यादिवशी नवरदेवाची वरात मिरवणूक निघत असते हे आपण पाहिलेले व ऐकलेले आहे. परंतु कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील एका कुटुंबाने चक्क नवरीची वरात मिरवणूक काढून मुलगा मुलगी समान या शासनाच्या उपक्रमाला अस्तित्वात उतरविले आहे. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे नवरदेवाची वरात निघते, त्याचप्रमाणे ही वरात काढण्यात आली. या घटनेची चर्चा जिल्हाभर पसरल्यानंतर त्या कुटुंबीयांचे कौतुक केले जात आहे.कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील बेंदरे परिवाराने मुलीचे मंगलकार्य दारव्हा येथील नारिंगे परिवारासोबत ठरले. मुलाच्या लग्नाच्या आदल्यादिवशी जशी वरात काढण्यात येते, त्याचप्रमाणे या नवरी मुलीचीही वरात काढण्यात आली. बेंदरे परिवारातील रेखाताई व नारायण आप्पा बेंदरे यांची सुकन्या भाग्यश्री हिचा विवाह सोहळा दारव्हा येथील विकास आप्पा नारिंगे यांच्या मुलासोबत संपन्न झाला. यानिमित्ताने लग्नाच्या आदल्या दिवशी सायंकाळी बेंदरे परिवाराने आपल्या कन्येची गावातून डीजेच्या तालावर वरात मिरवणूक काढून शासनाच्या लेक शिकवा लेक वाचवा, मुलगा मुलगी एक समान या शासनाच्या उपक्रमाला प्रतिसाद दिला असल्याचे दिसून आले. या प्रकाराची जिल्हाभर कौतुक होत असल्याने सदर बाब बुधवारी उघडकीस आली. ज्या प्रमाणे मुलगा हा वंशाचा दिवा आहे, त्याचप्रमाणे मुलगी ही वंशाची पणती आहे. माझ्या पतींनी हा निर्णय घेतला की मुलाप्रमाणे आपल्या मुलीची सुद्धा वरात काढावी व तो मलाही आवडला. मुलगा व मुलगी समान असल्याचे दाखवून दिले.- रेखाताई बेंदरे

https://www.dailymotion.com/video/x844qrs