ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ४ - समद्या गावाला झाली संडास बांधण्याची घाई, नवज्याले माया सांगुन-सांगुन थकले आता बाई, संडास बांध बांध बांध बांध... या सौराट सिनेमातील झिंगाट गाण्याच्या चालीवर लोककलावंत शुशिलाबाई घुगे यांच्या आवाजातील गाण्यावर कासोळ्यातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी ठेका धरुन नाचत होते. शौचालय नसणारे कुटुंब हेरुन दिंडीतील कलावंत त्यांच्या घरासमोर संडास बांधण्याची मागणी करत होते.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत कासोळा (ता. मंगरुळपीर) येथील ग्रामस्थांनी काढलेल्या स्वच्छता दिंडीने आज सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले. वाशिम येथील शाहिर मधुकर गायकवाड, आणि सुशिलाबाई घुगे यांच्या कलापथकाने खास गावराणी शौलीत हागणदारीमुक्तीचा संदेश दिला. शाळा व महाविद्यालयीन विद्याथ्र्यांच्या घोषणांनी गावातील परिसर दणाणुन गेला होता. तुझं गावच नाही का तीर्थ या मोहिमेअंतर्गत आज (दि 4) कासोळा या गावात स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छतेच्या दिंडीतील पालखीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे या दिंडीत सहभागी झाले होते.
गावातील श्री. मोतीरामजी ठाकरे उच्च माध्यमिक विद्यालयातुन या दिंडीला सुरुवात करण्यात आली. हातात स्वच्छतेचे संदेश देणारे फलक आणि वारकज्यांची भगवी टोपी घालुन असलेले दिंडीतील स्वच्छतादुत लोकांना शौचालय बांधा, उघडबवर शौचास जाऊ नका असे आवाहन करीत होते. ही दिंडी संपूर्ण गावाला फेरी मारुन परत ग्रामपंचायत कार्यालयात विसर्जित करण्यात आली.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे कार्यक्रम व्यवस्थापक राजु सरतापे, मंगरुळपीर पंचायत समितीेचे विस्तार अधिकारी पद्मने, जिल्हा परिषदचे माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंंगारे, क्षमताबांधणी तज्ञ प्रफुल्ल काळे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर, समाजशास्त्रज्ञ रविचंद्र पडघाण, स्वच्छता तज्ञ अमित घुले, सरपंच रेखाताई ठाकरे, बबनराव ठाकरे, उपसरपंच रोहिदास चव्हाण, ग्राससेवक मधुकर राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष पडघान, सामाजिक कार्यकर्ते इंदल राठोड, मुख्याध्यापक हरिष गांधी, तालुका समन्वयक अभय तायडे, ज्ञानेश्वर महाले, अभिजित गावंडे, महादेव भोयर यांच्यासह गावातील महिला व पुरुषांची मोठब प्रमाणात उपस्थिती होती. गावातील हरीत सेनेचे विद्यार्थी या स्वच्छता दिंडीत सहभागी झाले होते. गावाला हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.