शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : लातूर शहरात भाजपाच्या विजयाचा जल्लोष

By admin | Updated: April 21, 2017 20:21 IST

ऑनलाइन लोकमत  लातूर, दि. 21 - काँग्रेसची दीर्घकालीन सत्ता उलथून लावत लातूर महापालिका ताब्यात घेणाºया भाजपने शुक्रवारी जोरदार विजयोत्सव ...

ऑनलाइन लोकमत लातूर, दि. 21 - काँग्रेसची दीर्घकालीन सत्ता उलथून लावत लातूर महापालिका ताब्यात घेणाºया भाजपने शुक्रवारी जोरदार विजयोत्सव साजरा केला़ लातुरातील मुख्य रस्ते सायंकाळपर्यंत झेंडे, गुलाल अन् कार्यकर्त्यांच्या उत्साह वर्षावात न्हात होते़ एकिकडे भाजपकडून जोरदार विजय साजरा केला जात असतानाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही नगरसेवकांच्या विजयाचा तुकड्या-तुकड्यात जल्लोष साजरा केला. 
शुक्रवारी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात झाली़ तेव्हापासून विजयाची खात्री असणाºया उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी झेंडे, गुलालाची व्यवस्था करुन ठेवली होती़ फेºयांच्या एकूण मतमोजणीनंतर मिळणाºया आघाडीवरही केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात होता़ अत्यंत चुरशीची निवडणूक असल्याने जल्लोषातही चुरस पहायला मिळाली़ भाजपच्या उमेदवारास आघाडी मिळाल्याची घोषणा होताच भाजप कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत होते़ त्यामुळे चेव येऊन काँग्रेस कार्यकर्तेही त्यांच्या उमेदवाराच्या आघाडीवर जल्लोष साजरा करीत होते़ दरम्यान, एकेक निकाल बाहेर येऊ लागताच मतमोजणी केंद्राच्या बाहेर फटाके फुटू लागले, गुलालाने आसमंत गुलाबी होवू लागले अन् हवेत झेंडे फडकू लागले़ विजयाच्या घोषणेनंतर उमेदवारास खांद्यावर उचलून घेत गुलालाची अंघोळ घालत कार्यकर्ते बार्शी रोडने शिवाजी चौकाकडे वाजत-गाजत निघाले़ चौका-चौकात फटाके फोडून विजयी उमेदवारांचे जत्थे पुढे सरकत होते़ पाच नंबर चौक, एक नंबर चौक, पाण्याची टाकी, दयानंद गेट, शिवाजी चौक, अशोक हॉटेल चौक, गांधी चौक, गंजगोलाई, शाहू चौक, सम्राट चौक, विवेकानंद चौक, आदर्श कॉलनी गेट, राजीव गांधी चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, अशा प्रमुख चौकांसह आपापल्या प्रभागांतही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली़ भाजप कार्यकर्त्यांच्या जल्लोषात विजयोत्सव दिसून येत होता़ तर काँग्रेस कार्यकर्त्यांना सामुहिक जल्लोष करण्याची संधी न मिळाल्याने त्यांनी आपापल्या विजयी उमेदवारांसोबत जल्लोष केला़
 
विजयाच्या धगीत कचरा पेटला
 
उमेदवारांच्या विजयाच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष साजरा करण्यात येत होता़ या जल्लोषात फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येत होती़ परंतु, ही आतषबाजी करताना मतमोजणी केंद्राच्या बाहेरील रस्त्याशेजारी असलेल्या कचºयात एक जळता फटाका उडाला अन् त्याच्या धगीने कचरा पेटला़ याठिकाणी असलेल्या अग्निशमन दलाने तात्काळ पाण्याने ही आग विझविली़  
 
                      
https://www.dailymotion.com/video/x844vz4