शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

VIDEO : भाजपा सत्तातूर आणि शेतकरी चिंतातूर - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 19, 2017 15:45 IST

 ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 19 - शिवसेनेच्या नाशिक येथील कृषी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री दादा भूसे यांनी ...

 ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. 19 - शिवसेनेच्या नाशिक येथील कृषी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री दादा भूसे यांनी प्रास्तविक करताना शिवसेनेच्या केंद्रस्थानी शेतकरी असल्याचे सांगितले. शेतकरी आत्महत्या दुख:द असून त्यावर कर्जमुक्तीचाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफीची गरज असल्याचे ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री दादा भूसे, खासदार  संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विजय शिवतारे व शेतकरी यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
 
 उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे 
- शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 
- सत्तेवर लाथ मारायला मला एक क्षणाचाही विलंब लागणार नाही. 
- रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली, आता शेतकरी शांत बसणार नाही, साले म्हणाऱ्यांची साले काढतील
- सरकारने तूर घोटळा केला, तुरीचे बम्पर पीक येणार माहित असतांना तूर आयात केली
- खूप झाली मन कि बात,आता शेतकरी बोलतील
- समृद्ध मार्गासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीवर वरवंटा फिरवू नका. 
 
- शेतक-यांचा सत्यानाश करुन समृद्धी मार्गाने राजधान्य जवळ येऊ नयेत.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा काय फायदा. 
- शेतक-यांनी कर्जमुक्तीसाठी टाहो फोडल्यानंतर तुमच्या खिशाला भोक पडतात. 
- स्विस बँकेतले 15 लाख शेतक-यांच्या खात्यात जमा करा, कर्जमुक्तीची मागणी मागे घेतो. 
 
-  सत्तेत असतानाही विरोध केला कि प्रश्न विचारतात कि सत्तेत असून विरोध कसा, पण आमची बांधिलकी समाज आणि शेतकऱ्यांशी बांधीलकी.
- मुख्यमंत्री विरोधात असताना कर्ज माफी मागायचे आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रूपांतर झाले
- सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाही.
- मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय, शेतकरी कर्ज मुक्त करा, माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देऊ.
 
 
नाशिक कृषी अधिवेशनात  खासदार राजू शेट्टी म्हणाले
- शेतकऱ्यांवर किडा मुंग्यासारखे मारण्याची वेळ का आली? शेतकरी कर्ज मुक्ती म्हणत नाही, मोफत वीज मागत नाही पण आम्हाला सरकारचे अनैतिक कर्जाचे पाप नको आहे.
- शेतमालाचे भाव ठरविणारा कृषी मूल्य आयोग हा सरकारच्या हातचे बाहुले.
- गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने 2014 मध्ये भाजपा बरोबर त्यांनी स्वामीनाथान आयोगाचे शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले पण अमल नाही.
- मुख्यमंत्री विरोधात असताना आमच्या बरोबर कर्ज मुक्तीसाठी आंदोलन करायचे आता भाषा बदलली, किती अभ्यास करणार कोणत्या देशात जाणार अभ्यासाला.
- कर्ज मुक्ती केली नाही तर, 2019 च्या निवडणुका दूर नाही, शेतकऱ्यांनी सत्तेवर बसविले, पण आता मातीत घालतील.
- समृद्ध मार्गाचे स्वप्न , आधी शेतकरी समृद्ध करा. 
 
- समृद्ध मार्गाचे स्वप्न , आधी शेतकरी समृद्ध करा. 
 - सरकारच्या तूर डाळ आयात धोरणाने राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख 93 हजार कोटींचे नुकसान
-  उद्योगपतींनी 1 लाख 76 कोटीं बुडाले त्यावर का बोलत नाही त्यांना इतक्या कोटी रुपयांचे कर्ज दिले कसे
- 45 हजार शेकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचे कर्जही माफ केले नाही
-  22 तारखे पासून पुण्यात महात्मा फुले यांना अभिवादन करून पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा काढणार.
 

https://www.dailymotion.com/video/x844z8c