शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

VIDEO: शिवजयंती साजरी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

By admin | Updated: February 19, 2017 19:26 IST

ऑनलाइन लोकमत पेठ  (नाशिक), दि. 19  - छत्रपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यासाठी नाशिक शहर व परिसरातून हजारो दुर्ग ...

ऑनलाइन लोकमत

पेठ  (नाशिक), दि. 19  - छत्रपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यासाठी नाशिक शहर व परिसरातून हजारो दुर्ग पर्यटक, स्वयंसेस्वी संस्था व नागरिकांनी दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्यावर पहाटेपासून मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र अचानकपणे मधमाश्यांनी हल्ला केल्याने सर्वत्र एकच धावपळ व पळापळ झाली.

शिवजयंतीचे औचित्य साधून नाशिक शहरातील नामवंत डॉक्टर्स, सायकलिंग ग्रूप, ग्लोबल ग्रूप, सोशल नेटवर्किंग फोरम , वैद्यकिय महाविद्यालय विद्यार्थी मंच, नाशिक मेडिकोज यांचेसह शहरातील नागरिकांनी रामशेज किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी सात वाजेपासून पर्यटकांची गडाकडे आगेकूच सुरू झाली. यामध्ये पुरुष , स्त्रियासह लहान बालकांचा व विद्यार्थाचा मोठया प्रमाणावर सहभाग होता. किल्लावरील शिवध्वज स्तंभाजवळ शिवरायांच्या पुतळ्याच्या पूजनाची तयारी सुरू असतांना अचानक कडेकपारी करून मधमाश्यांचा ओघ सुरु झाला. प्रारंभी विरळ असलेल्या माशा वाढत गेल्या. गडावरील पर्यटकांच्या अंगाला माशा झोंबू लागल्याने एकच पळापळ सुरू झाली.
 
जो तो आपला जीव वाचवत गडावरून पायथ्याकडे पळू लागले. मात्र माशा काही पाठ सोडत नव्हत्या. दिसेल तेथे आसरा घेत माशापासून बचाव करत अवघ्या 15 मिनिटात संपूर्ण गड खाली झाला. अनेकांचे साहित्य, मोबाईल, बॅगा या गडबडीत पडून गेल्या. तर उतरत असतांना पाय घसरून पडल्याने काहींना किरकोळ जखमाही झाल्या. उपस्थित डॉक्टरांनी तात्काळ आपआपल्या हॉस्पीटला फोन करून रुग्णवाहिका मागवल्या तर काहींनी 10 8 ला कॉल केल्याने दहा मिनिटात रामशेजच्या पायथ्याशी सात - आठ रुग्णवाहिका दाखल झाल्या. माशांनी चावा घेतलेल्या रुग्णांवर जागेवर उपचार करण्यात आले. तर काहींना प्राथमिक    उपचार करून रुग्णालयात हलवण्यात आले. 
 
https://www.dailymotion.com/video/x844rh9