शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा सज्ज!

By admin | Updated: August 31, 2016 13:25 IST

यावर्षी समाधानकारक पिके असल्याने शेतकरी राजा मोठया आनंदात बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करणा-या पोळा सणासाठी सज्ज झाला आहे

नंदकिशोर नारे
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ३१ -  बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतक-यांचा महत्वाचा सण म्हणजे ‘पोळा’. दरवर्षी शेतक-यांवर कोसळणारे अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे शेतकरी पार खचलेला असतांना यावर्षी समाधानकारक पिके असल्याने शेतकरी राजा मोठया आनंदात बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करणा-या पोळा सणासाठी सज्ज झाला आहे. १ सप्टेंबर रोजी पोळा सणानिमित्त जिल्हयात बैलांचा साज विक्रेत्यांनी मोठया प्रमाणात दुकाने थाटली आहेत,  यावर्षी अनेक भागातील पीक परिस्थिती उत्तम असल्याने  जिल्हयात बैलांचा साज विक्रेत्त्यांच्या दुकानांवर मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. जिल्हयातील वाशिम शहरामध्ये १५, मालेगावशहरात ७, मानोरा शहरात ६, कारंजा शहरात १०, रिसोड व मंगरुळपीर प्रत्येक ६ बैलांच्या साज विक्रेत्यांची दुकाने लागली आहेत. मानोरा तालुक्यातील पीक परिस्थिती उत्तम नसल्याने येथे पोळा सणानिमित्त पाहिजे तसा उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र आहे.  या व्यतिरिकत जिल्हयातीलच मोठया बाजारपेठ असलेल्या शेलुबाजार, अनसिंग सारख्या ठिकाणीही काही प्रमाणात दुकाने थाटली आहेत. 
 
बैलाचा साज महागला
पोळानिमित्त विक्रीस आलेल्या बैलांचा साजाचे ही भाव गगनाला भिडल्याने अनेक गरीब शेतकºयांनी जुनाच साज बैलावर चढवून नविन खरेदीकडे पाठ फिरविली तर सदन कास्तकार खरेदीसाठी मात्र गर्दी करतांना दिसून येत आहेत.  सुताचे दर वाढलने व इतरही वस्तूचे भाव वाढल्याने बैलाचा साज महागल्याचे एका व्यापा-याने सांगितले.