शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : 'बोरीच्या बार’मध्ये शिव्यांऐवजी कलकलाट !

By admin | Updated: August 8, 2016 15:12 IST

खंडाळा तालुक्यातील बोरी अन् सुखेड या गावच्या दरम्यान असलेल्या ओढ्यात दरवर्षी नागपंचमीच्या दुस-या दिवशी ‘बोरीचा बार’ रंगतो.

ऑनलाइन लोकमत
लोणंद ( सातारा), दि. ८ -  खंडाळा तालुक्यातील बोरी अन् सुखेड या गावच्या दरम्यान असलेल्या ओढ्यात दरवर्षी नागपंचमीच्या दुस-या दिवशी ‘बोरीचा बार’ रंगतो. दोन्ही गावातील महिला समोरासमोर येऊन एकमेकींना खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देण्याची परंपरा आहे. मात्र, बदलत्या काळानुसार शिव्यांची पद्धत मागे पडत केवळ कलकलाट ऐकायला मिळतो. यंदाही सोमवारी दुपारी ‘बोरीचा बार’मध्ये रिमझिम पावसात शिव्यांऐवजी कलकलाट ऐकायला मिळाला.
या ओढ्याच्या काठी दोन्ही गावातील महिला दुपारी बारा वाजता मिरवणुकीद्वारे समोरासमोर आल्या. रिमझिम पावसातया ठिकाणी आल्यानंतर हलगीच्या तालावर बोरीचा बार रंगला. मात्र, यंदा ओढ्यात पाणी असल्याने महिलांच्या उत्साहावर पाणी फिरले. केवळ कलकलाटावरच ‘सोहळा साजरा’ झाला.
या ओढ्यात दोन्हीकडच्या महिला प्रततिस्पर्धी गावातील महिलेला ओढत आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या महिलेला ओढत आपल्या हद्दीत आणले जाते, तिला नंतर साडी-चोळीचा आहेर करुन तिची गावातून मिरवणूक काढली जाते. यंदा मात्र, परिसरात चांगला पाऊस असल्याने केवळ नदीच्या काठावर उभे राहून हातवारे करत कलकलाट करावा लागला. त्यानंतर गावात यात्रा भरली. यात्रेनिमित्तााने लहान मुलांसाठी खेळणी, मिठाईची दुकाने थाटली गेली होती.