शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

VIDEO- जनावरांच्या खाद्यासाठी आता आझोला

By admin | Updated: February 7, 2017 17:47 IST

ऑनलाइन लोकमत/निलेश शहाकार बुलडाणा, दि. 7 - जिल्ह्यात चा-याची संभाव्य कमतरता, पशुखाद्य, ढेप यांच्या वाढलेल्या किमतीमुळे दुभत्या जनावरांच्या खाद्याची ...

ऑनलाइन लोकमत/निलेश शहाकार

बुलडाणा, दि. 7 - जिल्ह्यात चा-याची संभाव्य कमतरता, पशुखाद्य, ढेप यांच्या वाढलेल्या किमतीमुळे दुभत्या जनावरांच्या खाद्याची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून शेतक-यांच्या जनावरांना स्वस्त व सकस पशुखाद्य मिळावे, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात प्रथमच आझोला जलशैवाळ खाद्याचा प्रयोग केला आहे. पश्चिम महाराष्ट्रानंतर हा विदर्भातील पहिलाच प्रयोग आहे.शेतक-यांसाठी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय नेहमीच फायदेशीर असतो. मात्र दुधाळ जनावरांना पुरेसा पोषक आहार मिळत नाही. त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होवून दुधाची गुणवत्ता घसरते. त्यामुळे शेतक-यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नाही. शिवाय यामुळे शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हा उपाय म्हूणन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून आझोला या शैवाळ खाद्याची निर्मिती करण्यात येत आहे. गत चार महिन्यापासून विभागाच्या कार्यालयात सदर प्रयोग सुरू आहे. शिवाय जिल्ह्यात हजारो शेतक-यांनी आपल्या दुधाळ जनावरांसाठी या आझोला शैवाळाचा लाभ घेतला आहे. काय आहे आझोलाआझोला हे जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते शेवाळ आहे. यामध्ये प्रथिने, आवश्यक एमिनो, असिड्स, जीवनसत्वे (व्हिटॅमीन ए. बी आणि बिटाकेरोरिन), खनिजांसाठी जसे कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह, तांबे, मॅग्नेशिअम आदी घटक मोठ्या प्रमाणात आहे. जे दुधाळ जनावरांसाठी आवश्यक आहे.कशी होते लागवडविटांनी तयार केलेल्या टाक्यांमध्ये प्लास्टिक शीट टाकली जाते. यात बारीक वाळू, माती टाकून त्यात शेणाचे स्लरी तयार करण्यात येते. यात विशिष्ट मिक्चर पाण्यात मिसळून टाक्यात टाकले जाते. यात मदर आझोला बी टाकण्यात येते. एक महिन्यानंतर प्रत्येक १० ते १५ दिवसानंतर ५००-६०० ग्राम आझोला प्राप्त होते. आझोला गहू व मका भरडा किंवा नुसतेचा जनावरांना खायला देता येतो.दुधाळ जनावरांसाठी आझोला उपयुक्त आहे. चारा व इतर खाद्याच्या वाढत्या किमतीमुळे आझोला शेतक-यांच्या जनावरांसाठी स्वस्त व फायदेशीर आहे. याचा शेतक-यांनी लाभ द्यावा.डॉ. ए. एल. खेरडेसहा.आयुक्त पशुसंवर्धन, बुलडाणा

https://www.dailymotion.com/video/x844qnq