शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

VIDEO - आणि त्याने खाटेच्या सहाय्याने कसली शेती........

By admin | Updated: July 4, 2016 13:32 IST

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील खडकी या गावातील विठोबा मांडवळी या शेतक-याकडे पैसा व शेतीची अवजारे नसल्याने त्याने अवघ्या एका खाटेच्या सहाय्याने नांगरणी केली.

जळगाव, दि. ४ - कितीही संकटे आली तरी इच्छा असेल तर मार्ग नक्कीच निघतो. औताचे भाडे देण्याएवढे पैसे गाठिशी नसतानाही परिस्थितीपुढे हार न मानता लोखंडी खाटेने शेत आखून दोन एकरात कपाशीची लागण पूर्ण केली. दुष्काळाने त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी पावसाने राज्यभरात दमदार हजेरी लावली आहे. ब-याच उशिरा पावसाचे आगमन झाले असले तरी आता शेतीसाठी पूरक वातावरण तयार झाले असून अनेक शेतक-यांनी शेतीची कामे हाती घेतली आहेत. मात्र विठोबा मांडोळे यांच्याकडे पैसा व शेतीची अवजारे नसल्याने त्यांची शेतीची कामे अडकून पडली. मात्र या अडचणीमुळे खचून न जाता एक नामी शक्कल लढवत चक्क एका 'खाटे'च्या सहाय्याने शेतीची आखणी केली. त्यांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
मांडोळे हे सुरुवातीला शेतमजुरीचे काम करायचे मात्र गेल्या सात वर्षांपासून इतरांचे शेत कसायला घेवून ते स्वत: शेती करीत आहेत.  या दरम्यान त्यांनी मेहनतीतून बऱ्यापैकी प्रगती साधली. वयाच्या पंचेचाळीशीनंतर स्वत:चे घरही उभे केले. बैल जोडी घेतली. मात्र गेल्या दोन वर्षातील दुष्काळी परिस्थितीने त्यांना आर्थिक विवंचनेत टाकले. गेल्या वर्षी तर अधिकच नुकसान झाले. चारा- पाणी नसल्याने यंदा बैलजोडीही विकावी लागली.
हे सर्व आघात सहन करीत असताना यंदा नव्या उमेदीने ते पुन्हा उभे राहिले आहेत. तीन एकर शेत त्यांनी कसायला घेतले असून शेतात सऱ्या पाडण्यासाठी औताचे भाडे देण्याची ऐपत नसल्याने त्यांनी लोखंडी खाटेने शेत आखून दोन एकरात कपाशीचे बियाणे लावले आहे.
उर्वरीत एक एकरात मक्याचे बियाणे लावणार असून हे बियाणे त्यांनी उधारीवर आणले आहे. निसर्गाने साथ दिली, चांगला पाऊस पडला तरच कापूस आणि मका शेती बहरेल आणि आयुष्याचा सारा मोहोर फुलून जाईल, अशी आशा ते व्यक्त करतात.