शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - अंबाबाई मंदिर परिसरात सापडले विरगळ

By admin | Updated: January 21, 2017 00:11 IST

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 20 -   कोल्हापूरातील अंबाबाई मंदिराच्या बाह्य परिसरातील जोतिबा मंदिराच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी विरगळ हे शिल्प ...

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 20 -   कोल्हापूरातील अंबाबाई मंदिराच्या बाह्य परिसरातील जोतिबा मंदिराच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी विरगळ हे शिल्प सापडले. चार फुट उंचीचे हे विरगळ साधारण ११ व्या ते १२ व्या शतकातील आहे अशी माहिती मूर्ती अभ्यासकांनी दिली. अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाज्याच्या पुढे जोतिबा रोड आहे. येथे गेल्या तीन दिवसांपासून गटारींच्या चॅनेलसाठी महापालिकेकडून खोदकाम सुरु आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडे चारच्या दरम्यान एस. ओ. कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर संतोष चव्हाण यांच्यासह कर्मचारी जेसीबीने खोदाई करताना आधी दीड फुट उंचीची नर्तकीची दुभंगलेले शिल्प सापडले. त्यानंतर पाईलखाली एक मोठे दगड लागले. या दगडाच्या आजुबाजूची माती काढून त्याखाली काही कर्मचाºयांनी हात घातल्यानंतर दगडावर कोरीम काम असल्याचे लक्षात आहे. त्यांनी दोरीच्या साह्याने दगड उचलण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही त्यामुळे जेबीसीच्या बकेटद्वारे हे शिल्प जमिनीतून बाहेर काढण्यात आले. परिसरातील नागरिकांनी हे शिल्प स्वच्छ केल्यानंतर ते वीरगळ असल्याचे लक्षात आले. या विरगळावर अत्यंत सुबक असे कोरीव काम असून ते अजूनही सुस्थितीत आहे. काळ्या पाषाणाचा पोत उत्तम आहे. हे शिल्प जोतिबा मंदिराला लागून ठेवण्यात आले आहे. 
 
काय आहे विरगळ?
वीरगळ म्हणजे युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीराचे स्मृतीशिल्प. ११-१२ व्या शतकात युद्धात विरमरण आलेल्या असंख्य अनाम विरांच्या नावे घडवलेले असे शेकडो वीरगळ कोल्हापुरात सापडतात. कसबा बीड येथे नदीपात्रात असे वीरगळ घडवण्याचा कारखानाच होता. वीरगळ हा विराचा आणि सतीचा असे दोन प्रकारचे असतात. सापडलेला वीरगळ हा वीराचा असून त्याचे टप्पे खालून वर मोजतात. खालच्या पहिल्या टप्प्यात घोड्यावर बसून युद्ध करणारा वीर दर्शवला आहे. मधल्या टप्प्यात शहिद वीराला देवलोकात घेवून जाणाºया अप्सरा दाखवल्या आहेत. तर अखेरीला पुरोहिताच्या साक्षीने शंकराची पूजा करून वीर कैलासात सालोक्य पावला असे चित्रण या वीरगळात असते अशी माहिती मूर्ती अभ्यासक अ‍ॅड. प्रसन्न मालेकर यांनी दिली. 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844orh