शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
8
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
9
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
10
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
11
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
12
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
13
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
14
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
15
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
16
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
17
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
18
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
19
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...

VIDEO : अंबाबाईला सुवर्णपालखी अर्पण

By admin | Updated: May 2, 2017 00:12 IST

 इंदूमती गणेश/आदित्य वेल्हाळ/ ऑनलाइन लोकमत  कोल्हापूर, दि. 2 - सप्तरंगी फुलांची आरास, इंद्रधनुषी विद्यूत रोषणाईने झळाळून निघालेले मंदिर, मराठमोळ््या ...

 इंदूमती गणेश/आदित्य वेल्हाळ/ ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 2 - सप्तरंगी फुलांची आरास, इंद्रधनुषी विद्यूत रोषणाईने झळाळून निघालेले मंदिर, मराठमोळ््या वाद्यांना लाभलेली दाक्षिणात्य संगीताची साथ, पवित्रानुभूती देणारे मंत्रोच्चार, तीन पीठाधीशांचे आर्शिवचन, अंबा माता की जय चा गजर, फुलांचा अखंड वर्षाव आणि महाआरतीने करवीर निवासिनी जगतजननी अंबाबाईला सोमवारी सुवर्णपालखी अर्पण करण्यात आली. या तब्बल २६ किलो सुवर्णपालखीेचा अर्पण सोहळी याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. 

दोन वर्षांपूर्वी संकल्पीत करण्यात आलेल्या या सुवर्णपालखीला देवीच्या चरणी अर्पण करण्यासाठी सुरु असलेल्या जय्यत तयारी सोमवारी अंतिम रुप घेतले. धार्मिक आणि ऐतिहासिक अधिष्ठान लाभलेल्या भवानी मंडपात साकारलेल्या आणि डोळ््याचे पारणे फेडणाºया रंगमंचावर हा सोहळा साकारला. कांचीपूरम येथील श्री कांची कामकोटी पीठाचे पिठाधीश जयेंद्र सरस्वती स्वामीजी, करवीर पीठाचे शंकराचार्य प.प. श्री विद्यानृसिंहभारती, राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीश प.पु. सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, संध्यादेवी कुपेकर, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडीक, शाहू छत्रपती, जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार, अरुंधती महाडीक, भरत ओसवाल उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व पीठाधीशांच्या हस्ते सुवर्ण पालखी व दस्तऐवज देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. 
कार्यक्रमाची सुरवात पवित्र मंत्रोच्चाराने झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, प्रत्येक चांगल्या कामातच लोकसहभाग आवश्यक असतो. कोल्हापूर समृद्ध शहर आहे. आता आपल्याला घेण्याची नाही तर समाजाला काही देण्याची सवय लावून घेतली पाहीजे. ईश्वर भक्तीत आमच्या भावना गुंतल्या आहेत त्यादृष्टीने साकारलेली ही सुवर्णपालखी म्हणजे देवीला वाहिलेली श्रद्धा आहे. खासदार धनंजय महाडीक यांनी प्रास्ताविकात सुवर्णपालखी साकारण्यामागील भूमिक विषद केली. व लोकसहभागातून महाराष्ट्रातील एखाद्या देवस्थानसाठी साकारण्यात आलेली ही पहिली सुवर्णपालखी असून त्यामुळे पर्यटनवृद्धी होईल असे नमूद केले. शाहू छत्रपती यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. 
---------------
नवरात्रौत्सवाचा अनुभव 
या सोहळ््यानिमित्त अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसराला मिळालेल्या झगमटागाने भाविकांचे डोळे दिपून जात होते. या मंगलमयी वातावरणाने आणि भाविकांच्या अलोट गर्दीने नवरात्रौत्सवाची आठवण झाली. हा सोहळा संपल्यानंतर सुवासिनींच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
https://www.dailymotion.com/video/x844wmi