शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - माणुसकीच्या भिंतीवर आता अल्टरची सुविधा

By admin | Updated: November 17, 2016 16:44 IST

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 17 :  भारत एक कदम चे अरविंद देठे यांनी पुढकार घेत सुरू केलेल्या माणसुकीच्या भिंतीपासून ...

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 17 :  भारत एक कदम चे अरविंद देठे यांनी पुढकार घेत सुरू केलेल्या माणसुकीच्या भिंतीपासून प्रेरणा घेत इतर शहरांमध्येही अशा भिंती उभ्या राहिल्यात. अकोल्यात . २० आॅक्टोबर रोजी ही माणुसकीची भिंत उभी राहिली अन् शेकडो सहृदयी दानशूरांनी मदतीचे हात पुढे केले हजारोंना या भिंतीमुळे हक्काचे कपडे मिळाले. आता याच भिंतीवर कपडे अल्टर करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. एखाद्या गरजवंताला कपडे पसंत आले परंतु ते कमी जास्त झाले असतील तर लगेचच तिथे असलेल्या टेलर कडून त्याला विनामुल्य कपडे मापात करून मिळणार आहेत.

राज्यात अकोल्यानंतर नागपूर, कोल्हापूर, बुलडाणा व जळगाव येथे अशा भिंती उभ्या राहिल्या आहेत मात्र अकोल्यातील माणुसकीच्या भिंतीवर देठे व त्यांचे सहकारी सुधाकर खुमकर यांनी सुरु केलेल्या या सुविधेमुळे गरजवंताला आवडलेले कपडे त्याच्याच मापाचेही करून देण्याची सोय झाली आहे. विशेष म्हणजे या भारत एक कदमने भारत एक कदम या सामाजिक संस्थेने अकोल्यात ह्यमाणुसकी देशासाठीह्ण हा उपक्रम राबवत बँकेत आलेल्या ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेसमोर मोठा मंडप उभारून, खुर्च्या टाकून, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करून एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे़

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एचडीफसी बँकेसमोर एक मोठा मंडप उभारून त्यात खुर्च्यांची व्यवस्था केली़ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली आहे़ या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला टोकन देण्याची व्यवस्था भारत एक कदमने केली असून, बुधवारी सकाळपासून या टोकनचे वितरण करण्यात येईल़ टोकन क्रमांकानुसार ग्राहकांचा पुकारा झाल्यानंतर त्यांनीच बँकेच्या आत शिरायचे व बाकीच्यांनी मंडपात खुर्च्यांवर बसून राहायचे, अशी ही व्यवस्था आहे़

https://www.dailymotion.com/video/x844ifk