शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर करमाळ्यातील शेतक-यांचं आंदोलन मागे

By admin | Updated: June 8, 2017 13:45 IST

ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 8 - मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका, अशी अखेरची चिठ्ठी लिहून करमाळा तालुक्यातील वीट गावातील ...

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 8 - मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका, अशी अखेरची चिठ्ठी लिहून करमाळा तालुक्यातील वीट गावातील कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे. धनाची चंद्रकांत जाधव (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  एकीकडे शेतकऱ्यांचा संप सुरू असताना करमाळा तालुक्यात घडलेल्या या घटनेने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
दरम्यान, धनाजी जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणी सरकारचा निषेध करण्यासाठी आज करमाळा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्याशिवाय जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांसह शेतक-यांनी घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी करमाळ्यात येऊन कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणीही वीट येथील ग्रामस्थांनी लावून धरली होती. 
 
या पार्श्वभूमीवर, सरकारचा निषेध करण्यासाठी शेतक-यांनी अहमदनगर बायपासवर रास्तारोको आंदोलन केले होते. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.  रास्तारोकोमुळे टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमार्गावर शेकडो वाहने अडकून पडली होती. रास्ता रोको आंदोलनात जि.प.अध्यक्ष संजय शिंदे, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, काँग्रेसचे आमदार जयवंतराव जगताप सहभागी होते. 
 
आंदोलनाच्या ठिकाणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख दाखल झाले. त्यांनी फोनवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. फोनवरुन चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनाजी जाधव यांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिल्यानंतर अखेर गावक-यांनी आंदोलन मागे घेतले. 
 
मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?
धनाजी जाधव अल्पभूधारक शेतकरी असल्यानं त्यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आले. शिवाय, त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च व आर्थिक मदतीचं आश्वासनही देण्यात आले. व धनाजी जाधव यांच्या कुटुंबीयांना तातडीनं 1 लाख रुपयांची मदत करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

https://www.dailymotion.com/video/x8452jm