शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : 500-1000 च्या नोटांचा विठ्ठल भक्तांना सुद्धा फटका

By admin | Updated: November 9, 2016 16:28 IST

ऑनलाइन लोकमत/सचिन कांबळे पंढरपूर, दि. 09 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या ऐतिहासिक ...

ऑनलाइन लोकमत/सचिन कांबळे
पंढरपूर, दि. 09 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या ऐतिहासिक निर्णय मंगळवारी रात्री घेतल्यामुळे अमाप काळा पैसा असणारा वर्ग अडचणीत आला आहे. त्याबरोबर सर्व सामान्य वर्गालाही या निर्णयचा सध्या मोठा फटका बसत असल्याचे जाणवत आहे. पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना या निर्णयामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कार्तिकी यात्रेनिमित्त सध्या पंढरपुरात लाखो भाविक येतात. पंढरपुरात येताना खर्चासाठी म्हणून भाविक 500 आणि 1000च्या नोटा घेऊन येतात. यामुळे जादा पैसे असल्याचे जाणीव होत नाही. त्याचबरोबर पैसे चोरी होण्याची शक्यताही कमी असते. यामुळे 500 आणि 1000 च्या नोटा भाविक घेऊन येतात. 
मात्र मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सकाळी पंढरपुरातील हॉटेल, लॉज, भक्त निवास, खेळणी, गाड्या, प्रसाद साहित्य व विविध वस्तु विक्री करणारे व्यापा-यांनी रात्रीपासूनच 500 आणि 1000 च्या नोटा घेण्यास नकार दिला. यामुळे अनेक भाविकांना सकाळी नाष्टापासून वंचित राहावे लागले आहे. पंढरपुरात पैसे सुट्टे मिळत नसल्याने अनेक वारक-यांना पंढरपुरातून माघारी परतावे लागत आहे.
 
दुकानात नोटा बंदचे फलक
पंढरपुरातील अनेक व्यापा-यांनी आपल्या दुकानात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद असे फलक लावले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी सुट्ट्या पैशावरुन वाद निर्माण होत आहेत.
 
आम्ही २२ जण कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी सह कुटुंब आलो आहोत. परंतु काल रात्रीपासून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्या आहेत. यामुळे साधा साध्या वस्तु खरेदी करताना अडचणी निर्माण होत आहे. त्याचबरोबर राहण्याची व खाण्याचीही गैरसोय होत आहे. यामुळे लवकरच आपल्या गावी परतणार आहेत.
- प्रशांत मेरस 
भाविक, (रा. साखरखेरडा, जि. बुलढाणा)
 
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यापुर्वी शासनाने सुचना देणे आवश्यक होते. अशी कोणत्याही प्रकारची सुचना न दिल्याने पंढरपुर येथे कार्तिकी यात्रेसाठी आलेले भाविकांचे विविध समस्यांना समोरे जावे लागत आहे.
- सिध्दनाथ कोरे
जिल्हा उपाध्यक्ष, ग्राहक संरक्षण कक्ष, शिवसेना
 
ग्राहक 500 आणि 1000 च्या नोटा देत आहेत. त्यांना सुट्टे देण्यासाठी १०० रुपयांच्या नोटा नाहीत. यामुळे ग्राहकांना माल विक्री करता येत नाही. यामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी असून देखील जादा व्यवसाय होणार नाही.
- व्यंकटेश अवताडे
व्यापारी, पंढरपूर
 
 

https://www.dailymotion.com/video/x844hcs