शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अनुकरणातून १५ वर्षिय रवी ने जगविले १० लिंबुची झाडे!

By admin | Updated: January 8, 2017 11:29 IST

ऑनलाइन लोकमत / नंदकिशोर नारे वाशिम,दि. 8 -शिरपूर येथील एका पंधरा वर्षिय रवी नामक मुलाने अनुकरणातून शेतातील धुऱ्यावरील लिंबुची ...

ऑनलाइन लोकमत / नंदकिशोर नारे

वाशिम,दि. 8 -शिरपूर येथील एका पंधरा वर्षिय रवी नामक मुलाने अनुकरणातून शेतातील धुऱ्यावरील लिंबुची झाडे जगविण्याचा उपक्रम राबवून परिसरात कौतुकास पात्र ठरला आहे.वाशिम जिल्हयातील जैनाची काशी म्हणून प्रसिध्द असलेले गाव शेतीमध्ये नवनविन प्रयोग करण्यात सर्वात पुढे आहे. येथील शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांची मुले सुध्दा नवनविन प्रयोग करीत असल्याचे दिसून आले. शिरपूर जैन येथे विठ्ठल पिराजी तिरके या शेतकऱ्याचे कुटुंब वास्तव्यास आहे. शेतीत नवनविन प्रयोग करुन त्यांनी त्यांच्याकडे असलेली १० एकर शेती १५ एकर केली. शेताच्या धुऱ्याच्या बाजुला रवीच्या वडिलांनी १० लिंबुची झाडे लावलीत. एकेदिवशी गावातीलच एका घरात त्याने लिंबुच्या एका झाडाला सलाईनव्दारे पाणी देण्याचा प्रयोग पाहिला. त्याने कुणाशी काही न बोलता घरी आला. वडिलांकडून काही पैसे घेतले व गावातीलचं दवाखान्यांमध्ये जावून वापर केलेल्या सलाईनच्या खाली बॉटल्स जमा केल्यात. त्याला त्या बॉटल्स मोफतचं मिळाल्यात. त्याने त्या कापून व्यवस्थित एका झाडाखाली एक बॉटल्स लावून ठिंबक पध्दतीने झाडांना पाणी देणे सुरु केले. दररोज शाळेत जाण्याआधी व परत येतांना रवी आठवणीने सलाईनच्या बॉटल्स भरुन ठेवतो. त्या बॉटलमधील पाणी जवळपास तीन तास पूरत असल्याने दोन वेळा त्या बॉटल भरल्या जात आहेत. सहा तास थेंब थेंब पाणी लिंबाच्या झाडाला मिळत आहे. यामुळे झाडाजवळ ओलावा निर्माण राहत असल्याने झाडाची वाढ होत आहे. याबाबत त्याच्या वडिलाना विचारले असता मुलाने केलेला प्रयोग पाहून कौतूक वाटले. त्याने केलेला प्रयोग झाडांसाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. एवढया कमी वयात त्याला ही बाब कळल्याचा आनंदही झाला. 

https://www.dailymotion.com/video/x844nke