शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नीतेश राणेंविरोधात सरसावले विदर्भवादी

By admin | Updated: August 25, 2016 21:26 IST

राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांच्यासोबत विदर्भवाद्यांना मारण्याचे वक्तव्य करणारे कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात विदर्भवादी सरसावले आहेत.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 25  : राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांच्यासोबत विदर्भवाद्यांना मारण्याचे वक्तव्य करणारे कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात विदर्भवादी सरसावले आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. मारण्याची धमकी देणाऱ्या राणे यांना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. गुरुवारी नीतेश राणे यांचा हिंगणघाट येथे पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

नीतेश राणे बुधवारी नागपुरात आले असताना त्यांनी विदर्भवाद्यांवर जोरदार टीका करीत वेळ पडली तर मार देण्याची भाषा वापरली होती. यासंदर्भात सुरुवातीला विदर्भवाद्यांनी राणे यांच्याकडे दुर्लक्षच करण्याची भूमिका घेतली होती. परंतु गुरुवारी मात्र विदर्भात अनेक ठिकाणी विदर्भवाद्यांनी राणेंविरोधात पोलीस तक्रार केली. नीतेश राणे यांनी भडकावू वक्तव्य केले असून विदर्भातील जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली असून याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी विदर्भवाद्यांची मागणी आहे.

विदर्भात अनेक ठिकाणी नीतेश राणे यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आला. नागपूर, वणी, साकोली, तुमसर, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर येथे विदर्भवादी कार्यकर्त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी केल्या. नीतेश राणे यांनी सार्वजनिकपणे विदर्भवादी नेत्यांना मारण्याची धमकी दिली आहे. यापुढे विदर्भवादी नेता किंवा कार्यकर्त्यांसोबत कुठलाही हल्ला झाला तर त्याला नीतेश राणे हेच जबाबदार राहतील, अशी विदर्भवाद्यांनी भूमिका घेतली आहे.