शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा आवाज, महाराष्ट्राचा हुंकार

By admin | Updated: May 2, 2017 04:33 IST

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. विविध

नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विदर्भवाद्यांनी आपला निषेध व्यक्त करत स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लावून धरली. दुसरीकडे अखंड महाराष्ट्रवाद्यांनीदेखील महाराष्ट्र दिनाचा जल्लोष केला. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र काही तुरळक घटना वगळता एकूणच १ मेचा दिवस शांततेत पार पडला.राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात बजाजनगर येथील ‘विष्णूजी की रसोई’ येथे सकाळी ९ वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकविण्यात आला. या वेळी विविध विदर्भवादी संघटनांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी जनमंच, विदर्भ कनेक्ट, विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी यांसारख्या विविध विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दुसरीकडे सकाळी ९.३०च्या सुमारास विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे गिरीपेठ येथील कार्यालयाजवळ वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शनेकाही विदर्भवाद्यांनी धरमपेठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने केली. भाजपाने विदर्भ राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी त्वरित हालचाल करीत अवघ्या मिनिटाभरातच सात ते आठ आंदोलकांना ताब्यात घेतले. मनसेतर्फे आतशबाजीबजाजनगरात एकीकडे वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकविला जात असताना बाजूलाच मनसेतर्फे शहरातील काही ठिकाणी जल्लोष करण्यात आला. मध्यरात्री धरमपेठेत आतशबाजी करून महाराष्ट्र दिनाचे स्वागत करण्यात आले. शिवाय शहरात मिठाईचे वाटपदेखील करण्यात आले. या वेळी श्रमिक व कामगारांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, दुपट्टा, होमिओपॅथी औषध वितरित करण्यात आले. (प्रतिनिधी)नागपुरात प्रारंभवेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसंदर्भात ‘विरा’तर्फे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच निवेदन देण्यात येणार आहे. पंतप्रधानांना पाठविण्यात येणाऱ्या पत्रावर विदर्भवादी स्वत:च्या रक्ताचा अंगठा लावणार आहेत. अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी मेहाडिया चौकात आयोजित कार्यक्रमादरम्यान रक्ताने स्वाक्षरी या मोहिमेची सुरुवात केली.अकोल्यात विदर्भवाद्यांना धक्काबुक्की!अकोला : वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भवाद्यांच्या आंदोलनात शिवसैनिकांनी प्रचंड धुडगूस घालून आंदोलन उधळून लावले. स्थानिक मदनलाल धिंग्रा चौकात ब्रजलाल बियाणी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वेगळ्या विदर्भाचे नारे देणाऱ्या विदर्भवाद्यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की करत विदर्भाच्या झेंड्याची होळी केल्याचा प्रकार सोमवारी घडला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे पुढील प्रकरण निवळले.