अकोला : विदर्भातील संत्रा पिकाला बदलत्या हवामानाची झळ बसली असून, यंदा संत्र्याला बहर गळती सुरू झाली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. यापृष्ठभूमिवर संत्रा उत्पादक शेतकर्यांनी शासनाला निवेदन देऊन संत्रा उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.राज्यात सर्वाधिक १ लाख ५0 हेक्टर संत्रा फळ पिकाचे क्षेत्र विदर्भात आहे. परंतु सतत बदलत असलेल्या हवामानामुळे, संत्रा फळे व क्षेत्र वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यावर्षीही तेच चित्र असून, जवळपास महिनाभर पाऊसच नसल्याने तापमान प्रचंड वाढले होते. त्यामुळे संत्र्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. मोठय़ा प्रमाणात बहर गळती सुरू झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. डिंक्या या रोगाचा सामना करणार्या संत्र्यावर (कोलॅकोट्रायकम) मूळकूजसारखा बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव वाढत असल्याने बहर गळतीत वाढ झालेली आहे. रोजगार हमी योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात आल्याने फळ क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आला आहे. राज्यात केळी ८२ हजार हेक्टर, द्राक्ष ९0 हजार हेक्टर, पेरू ३९ हजार हेक्टर, आंबा ४८२ हजार हेक्टर, पपई १0 हजार हेक्टर, लिंबूवर्गीय फळे २७७ हजार हेक्टर, डाळिंब ७८ हजार हेक्टर, चिकू ७३ हजार हेक्टर तर इतर फळ पिके जवळपास ४१८ हजार हेक्टर क्षेत्रावर आहे. प्रतिकुल हवामानामुळे संत्रा उत्पादक शेतकरी यंदा अडचणीत सापडला आहे. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संत्र्यांवर येणार्या डिंक्या या रोगाचा सामना नेहमीच करीत असतो; तथापि यावेळी वातावरणात बदल झाला असून, सतत बदलत असलेल्या हवामानामुळे बुरशीजन्य कोलॅटोट्रायकम रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार औषधांची फवारणी करावी.
विदर्भातील संत्रा बहराला गळती सुरूच
By admin | Updated: September 9, 2014 04:45 IST