शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात शिवसेनेची नीचांकी कामगिरी

By admin | Updated: October 24, 2014 04:32 IST

विदर्भातून शिवसेनेचे यावेळी केवळ चार आमदार निवडून आले. ही या पक्षाची १९९५ पासूनची नीचांकी कामगिरी आहे.

मुंबई : विदर्भातून शिवसेनेचे यावेळी केवळ चार आमदार निवडून आले. ही या पक्षाची १९९५ पासूनची नीचांकी कामगिरी आहे. शिवसेनेने पूर्व विदर्भात एक आणि पश्चिम विदर्भात तीन जागा जिंकल्या. गेल्यावेळी हा आकडा तीन आणि पाच असा होता. १९९५ मध्ये युतीच्या लाटेत शिवसेनेला विदर्भात ११ जागा मिळाल्या होत्या. त्या यशाची गेल्या १९ वर्षांत पुनरावृत्ती करता आलेली नाही. हिंदुत्वाचा भगवा खांद्यावर घेऊन आलेल्या शिवसेनेला एकेकाळी विदर्भात प्रचंड समर्थन मिळाले होते. शिवसेनेचे मुंबईतून आलेले नेते आणि उदयास आलेले स्थानिक आक्रमक नेते यांनी वातावरण भगवामय केले होते. मात्र गेल्या १५ वर्षांत मुंबईहून जिल्ह्णाजिल्ह्णात आलेल्या संपर्क प्रमुखांबद्दल नाराजीचे सूर गडद झाले. संपर्क प्रमुखांशी खास असेल त्याचेच नाव मातोश्रीपर्यंत पोहोचेल, असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे या संपर्क प्रमुखांची विविध प्रकारे सेवा करीत राहणे याला महत्त्व आले. आक्रमक हिंदुत्वाच्या आधारे शिवसेनेने विदर्भात दमदार पाऊल ठेवले होते. मात्र, त्याचा नंतरच्या काळात विसर पडत गेला. संघ-भाजपाच्या तुलनेत शिवसेनेचे असलेले आक्रमक हिंदुत्व तरुणांना आकर्षित करणारे होते पण ते पुढे टिकले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणाऱ्या तरुणांना बांधून ठेवेल, अशी यंत्रणा उभारता आली नाही. गेल्या कित्येक वर्षांत शिवसेनेने विदर्भातून एकाही नेत्याला विधान परिषद वा राज्यसभेची संधी दिली नाही. विदर्भातील आमदार मुंबईच्या नेत्यांना मते देत राहिले.