शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील डॉक्टर आजपासून संपावर

By admin | Updated: November 25, 2015 03:46 IST

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्यवहारे यांच्या जाचाबाबत पदव्युत्तर आणि पूर्वपदवीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे तक्रारी केल्या.

मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्यवहारे यांच्या जाचाबाबत पदव्युत्तर आणि पूर्वपदवीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे तक्रारी केल्या. पण, डॉ. व्यवहारे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टर्सने (मार्ड) राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. नागपूरचे आयजीएमसी आणि यवतमाळचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर बुधवार सकाळपासून संपावर जाणार आहेत, तर गुरुवारपासून राज्यातील अन्य निवासी डॉक्टर बेमुदत संपात सहभागी होतील.नागपूरच्या जीएमसीत न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्यवहारे विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एका विद्यार्थ्याने २० नोव्हेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत विभाग प्रमुख डॉ. व्यवहारे यांच्या जाचाला कंटाळल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी पदव्युत्त शिक्षण घेणाऱ्या एका मुलीनेदेखील या विभाग प्रमुखांविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर रविवारी पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या विभाग प्रमुखांच्या विरोधात तक्रार केली, असे मार्डचे उपाध्यक्ष डॉ. अमित लोमटे यांनी सांगितले. या विभाग प्रमुखांची सखोल चौकशी व्हावी. या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश नेमण्यात यावा. या विभाग प्रमुखांची ज्या ठिकाणी विद्यार्थी नसतील, अशा केवळ हॉस्पिटल असलेल्या ठिकाणी बदली करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची बदली करावी, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे अथवा त्यांना निलंबित करावे अशा मार्डच्या प्रमुख मागण्या आहेत. या विभाग प्रमुखांविरोधात इतक्या तक्रारी येऊनही रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. विभाग प्रमुखांची सखोल चौकशी करावी, असे निवेदन स्थानिक मार्डने दिले होते. मात्र, याची प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही. या संदर्भातील सुनावणीवेळीही विभाग प्रमुख उपस्थित नव्हते. त्यांनी त्यांची बाजूदेखील मांडली नाही. त्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे मार्डचे म्हणणे आहे. त्यामुळे जीएमसी मार्ड सोमवारपासून संपावर गेले आहे. तरीही अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्यवहारे यांच्या जाचाबाबत पदव्युत्तर आणि पूर्वपदवीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे मार्डने संप पुकारला आहे. विभाग प्रमुखांची सखोल चौकशी करावी असे निवेदन स्थानिक मार्डने दिले होते. मात्र, याची प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही.