शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ माझा पक्ष निवडणूक लढविणार - नगर परिषदेपासून सुरुवात

By admin | Updated: May 16, 2016 20:33 IST

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी झालेल्या विचारमंथनात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लोकशाही पद्धतीने पुढे नेण्यासाठी विदर्भ माझा हा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १६ : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी झालेल्या विचारमंथनात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लोकशाही पद्धतीने पुढे नेण्यासाठी विदर्भ माझा हा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी विदर्भाच्या मुद्यावर आगामी ६० नगर परिषद, महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढविल्या जातील, अशी घोषणा पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी केली. तिरपुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लोकांना विदर्भ हवा आहे. त्यासाठी लोक एकत्र येऊन मतदानाच्या माध्यमातून ताकद दाखविण्यास तयार आहे. मात्र, काही पक्षांकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेचे पाठबळ मिळविण्यासाठी विदर्भाच्या मुद्यावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भासाठी आंदोलन करणाऱ्या बहुतांश सामाजिक संघटनांनी पक्षाला निवडणूक लढविण्यासाठी पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भाच्या चळवळीसाठी, विकासासाठी काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. यासाठी ग्रामीण भागात, तालुका पातळीवर विदर्भवाद्यांच्या मदतीने पक्ष बांधणीवर भर देण्यात आला आहे.१९ मे रोजी विदर्भ राज्य संकल्प दिवस- विदर्भवादी जनतेतर्फे १९ मे हा दिवस ह्यविदर्भ राज्य संकल्प दिवसह्ण म्हणून पाळला जातो. स्वतंत्र विदर्भाचे खंदे समर्थक व महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विदर्भवादी हा दिवस साजरा करतात. या वर्षीही या दिवशी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शहरे व ग्रामीण भागात लोक विदर्भ राज्य मिळविण्याचा जाहीर संकल्प घेतील. नागपुरातील तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रम होईल. विदर्भभर हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल.