राज्यसभा, विधान परिषद अथवा प्रवक्तेपदही नाही
मुंबई : शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या सहा प्रवक्त्यांपैकी एकही विदर्भ वा मराठवाडय़ातील नाही. राज्यसभा, विधान परिषदेवरही केवळ मुंबईकर चेह:यांनाच शिवसेनेची पहिली पसंती असते.
या संदर्भात विदर्भातील एक माजी आमदार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, गेल्या 2क् वर्षात शिवसेनेने विदर्भातून कोणालाच राज्यसभा वा विधान परिषदेवर पाठविलेले नाही. विजय वडेट्टीवार यांना 1998मध्ये शिवसेनेने विधान परिषदेवर पाठविले होते. त्यानंतर 16 वर्षात शिवसेनेने या संधीबाबत विदर्भाला वेगळेपणाचीच वागणूक दिली आहे. मातोश्रीवरून उमेदवार ठरणार आणि आम्ही केवळ मतदान करायला जाणार हे वर्षानुवर्षाचे सूत्र ठरलेले आहे. राष्ट्रवादीसारखा विदर्भात फारसा प्रभाव नसलेला पक्ष राज्यसभा, विधान परिषदेवर संधी देताना विदर्भातील नेते आणि कार्यकत्र्याचा विचार करतो; पण शिवसेनेच्या नेतृत्वाला विदर्भाची दखल घ्यावीशी वाटत नाही. शिवसेनेच्या संघटनेत नेते आणि उपनेतेपद महत्त्वाचे असते. ही पदेही मुंबईकर नेत्यांनाच बहाल केली जातात. मुंबई संपर्क प्रमुखांचेच म्हणणो आम्हाला ऐकावे लागते. नाही ऐकले तर मातोश्रीवर तक्रार केली जाते. स्थानिक नेत्यांचे रिपोर्ट कार्ड संपर्क प्रमुखांच्या हाती असते. पक्षवाढीसाठी आमच्या काही कल्पना असतात पण त्यांना कच:याची टोपली दाखविली जाते. हिंगणघाटचे माजी आमदार अशोक शिंदे हे उपनेते आहेत पण या पदाचे अधिकार काय आहेत हे त्यांनाही माहिती नसावे. (विशेष प्रतिनिधी)