शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातही तीव्र पडसाद

By admin | Updated: June 2, 2017 01:13 IST

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे पडसाद अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उमटले असून अमरावतीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे पडसाद  अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उमटले असून अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुरुवारी दुपारी २ वाजता कांदे, भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.यवतमाळ जिल्ह्यात विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील शेंबाळपिंपरीत शेतकऱ्यांनी रस्त्यावर १०० ते १५० लीटर दूध ओतून शासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. तर वर्धेतील दूध उत्पादकांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत तब्बल १५५ लीटर दूध फेकले. यवतमाळात जिल्हा काँग्रेस कमिटीने शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून वणी आणि घाटंजी येथे शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. यवतमाळ शहरात मात्र या संपाचे कोणतेही पडसाद उमटले नाहीत. भाजीबाजारासह शेतकऱ्यांशी संबंधित सर्व व्यवहार सुरळीत होते. वर्धेलगतच्या भुगाव, तळेगाव (टा.), येथील शेतकऱ्यांचा या आंदोलनात सहभाग होता. आंदोलनानंतर दूध उत्पादकांनी विविध मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. तर भाजी बाजारात स्थिती सर्वसामान्य होती. याव्यतिरिक्त हिंगणघाट येथे शेतकरी संघटना व किसान क्रांतीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आष्टी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात वाकोडी या गावात धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपणही आंदोलनात मागे नसल्याचे दाखवून दिले. पाटणसावंगी येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकोडी या गावात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वाकोडी या गावातील आशिष राऊत हे दुधाचा व्यवसाय करतात. आंदोलनादरम्यान त्यांनी दुधाचे कॅन आंदोलन स्थळी जमिनीवर टाकून यापुढे आपण शहराला दूधपुरवठा करणार नाही, असा संकल्प केला.शिवसेनाप्रणीत किसान सेनेच्या वतीने सकाळी बुलडाण्यातील स्टेट बँक चौकात रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांच्या संपाला समर्थन देण्यात आले. शिवसेनेचे नेते खासदार तथा संपर्कप्रमुख प्रताराव जाधव यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. बुलडाणा शहर पोलिसांनी काही काळासाठी आंदोलकांना ताब्यात घेतले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बुलडाणा जिल्हा काँग्रेस समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे.पश्चिम वऱ्हाडात प्रतिसादअकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बाग फाटा येथे शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून संपात सहभाग घेतला. अकोला व अकोट शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भाजीपाल्याची रात्री खरेदी करण्यात आलेली असल्याने पहिल्या दिवशी या संपाचा परिणाम जाणवला नाही. वाशिम जिल्ह्यातील गट ग्रामपंचायत टनका येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून बेमुदत संप पुकारला असून गावातील मंदिरासमोर ठिय्या दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्यशासन गंभीर नसल्याचा आरोप करीत, शेतकऱ्यांनी शहरात दैनंदिन येणारे शेकडो लीटर दुध गुरुवारी गावातच वाटले. शासन जोपर्यंत मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत संप कायम राहील, असा निर्धार गावकऱ्यांनी बोलून दाखविला आहे.प्रफुल्ल पटेल यांना अटकगोंदिया : शेतकरी कर्जमाफी यासह नागरी समस्यांबाबत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जयस्तंभ चौकात रास्ता रोको आंदोलनही केले. रास्ता रोको आंदोलन मागे न घेतल्याने खा. पटेल यांच्यासह आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली.