शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

विदर्भातील सूतगिरण्यांना अखेरची घरघर!

By admin | Updated: December 25, 2015 03:16 IST

नवीन वस्त्रोद्योग धोरणातून जुन्या सूतगिरण्या बाद

राजरत्न सिरसाट/अकोला राज्यातील कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी अर्धे म्हणजे २0 लाख हेक्टरवर क्षेत्र विदर्भात असले तरी, विदर्भातील सूतगिरण्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. नवीन वस्त्रोद्योग धोरणातून जुन्या सूतगिरण्या वगळल्याने अखेरच्या घटका मोजणार्‍या या सूतगिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. विदर्भात कापसाचे क्षेत्र मोठे असल्याने येथील कापसाच्या उत्पादनावर या भागात सूतगिरण्यांची संख्या २५ वर वाढली होती. ७६२ जिनिंग-प्रेसिंग सुरू झाले होते; तथापि हा आकडा झपाट्याने कमी झाला असून, आजमितीस केवळ दोन ते तीन सूतगिरण्या तग धरू न आहेत. या भागात पुन्हा कापूस ते कापड उद्योग उभे राहावेत, याकरिता राज्य सरकारने २0११ पासून राबविलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. यानुसार राज्यभरात जवळपास ५११ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. विदर्भात यातील ५९ प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये सूतगिरण्या, गारमेंटस्, जिनिंग-प्रेसिंग तसेच प्रोसेसिंग प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. २0११ ते २0१७ या पाच वर्षांकरिता नवीन प्रकल्प उभारण्याचे राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग संचालनालयाचे धोरण आहे. याकरिता वस्त्रोद्योग क्षेत्रात ४0 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, नवीन वस्त्रोद्योग प्रकल्पांना २0 टक्केच्या जवळपास अनुदान दिले जाणार आहे. जुन्या सूतगिरण्यांचा या धोरणात समावेश नाही; परंतु विदर्भातील ज्या सूतगिरण्या प्रतिकूल परिस्थितीत उभ्या आहेत, त्यांच्यासमोर सूतगिरण्या पुढे सुरू ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. जुन्या सूतगिरणीतील यंत्राचे काहींनी आधुनिकीकरण केले आहे, तर काहींना करायचे आहे. यासाठी या सूतगिरण्यांना अनुदानाची गरज आहे. पण, नवीन वस्त्रोद्योग धोरणात या सूतगिरण्यांना डावलण्यात आले आहे. अस्तित्वातील एक-दोन सूतगिरण्या सूतनिर्मिती करीत आहेत. परंतु, बाजारात सूताला मागणी नसल्याने त्यांना प्रतिकिलो सूतामागे २0 ते ३0 रुपयांच्यावर तोटा सहन करावा लागत आहे. एकीकडे वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी भरभक्कम गुंतवणूक करायची आणि जुन्या सूतगिरणी, जिनिंग-प्रेसिंगला डावलण्याचे धोरण या भागातील सूतगिरण्या चालवणार्‍या शेतकरी संचालकांच्या मुळावर उठले असल्याचा आरोप होत आहे.