शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात अद्याप ६ टक्के पाऊस कमीच!

By admin | Updated: September 5, 2014 01:46 IST

वाशिम, बुलडाणा, यवतमाळ जिल्हा तहानलेलाच

अकोला : विदर्भात ६ टक्के पावसाची तूट कायम असून, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्हयात अद्याप ३0 टक्के पाऊस कमी आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची मोठी शक्यता आहे. यावर्षी दीड महिना उशिरा पावसाला सुरुवात झाली. १५ व २३ जुलै रोजी पावसाने हजेरी लावली; त्यानंतर २९ ते ३१ ऑगस्टपर्यंत तुरळक पाऊस झाला . पण या पावसाने विदर्भातील एकूण सरासरी गाठली नसून, सरासरी ५ टक्के पावसाची तूट कायम आहे. सर्वाधिक पावसाची झळ पूर्व विदर्भा तील वाशिम, बुलडाणा, यवतमाळ जिलला बसली असून, बुलडाणा जिल्हयात ही तूट ३६ टक्के असून, वाशिम २५ टक्के, यवतमाळ जिल्हयात २५ टक्के, अमरावती व अकोला जिल्हयात पावसाची ५ टक्के तूट आहे. ४ सप्टेंबर सकाळी ८.३0 वाजेपर्यंत विदर्भात एकूण ५६४.८ मि.मी. पावसाची नोंद नागपूर येथील हवामानशास्त्र विभागाने केली आहे. तथापि नार्मल ५९७.९ मि.मी. पाऊस हवा होता. त्यामुळे संपूर्ण विदर्भात ६ टक्के पाऊस कमी आहे. दरम्यान, संपलेल्या २४ तासांत ४ सप्टेंबर सकाळी ८.३0 वाजेपर्यंंत विदर्भातील चिखलदरा येथे २ सेमी., धानोरा, मलकापूर, संग्रामपूर, सडक अर्जुनी व कुरखेडा या ठिकाणी प्रत्येकी १ से.मी. पावसाची नोंद झाली आहे. * पावसाचा इशाराकोकण-गोव्यात बर्‍याच ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यात पुणे हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.* पश्‍चिम विदर्भातील धरणाचा जलसाठा पुरेपूर पाऊस नसल्याने पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम येथील धरणांच्या जलपातळीत अल्प वाढ झाली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपुर्णा धरणात केवळ २७ टक्के जलसाठा आहे. मोर्णा या धरणात ४२.४७ टक्के,निगरुणा ७८.७२ टक्के तर उमा या धरणात केवळ १७.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात ४0.७५ टक्के, ज्ञानगंगा ५४.३५ टक्के, मस ९0.९६, कोराडी ८४.३९ टक्के तर पलढग या धरणात ६५.२५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा धरणात ६८.0१ टक्के, लोअरपूस ८७.७२ टक्के, गोकी धरणात ८0.७८ टक्के तर सायखेडा, वाघाडी व बोरगाव धरणे शंभर टक्के भरले आहे.