ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 12 - वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. याअंतर्गतच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानासमोर ९ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात विदर्भवाद्यांसह, शेतकरी व तरुणदेखील समाविष्ट होतील, अशी माहिती देण्यात आली आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर जिल्हा कार्यकारिणीची नागपूरात बैठक झाली. लोकसभा निवडणूकांच्या वेळी गडकरी यांनी केंद्रात सत्ता आली तर विदर्भ वेगळे राज्य करु असे आश्वासन दिले होते. परंतु आता ते विदर्भाबाबत मौन साधून आहेत. गडकरी यांना या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी ९ आॅगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने नागरिक एकत्र यावेत यासाठी १५ ते ३० जुलै या कालावधीत नागपूर शहरात ५० ह्यकॉर्नरह्ण बैठका घेण्यात येतील. ९ आॅगस्ट रोजी महाल येथील टिळक पुतळ्यापासून दुपारी १२ वाजता मोर्चा निघेल, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष डॉ.दिलीप नरवडीया यांनी दिली.
वेगळ्या विदर्भासाठी गडकरींच्या घरासमोर विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार आंदोलन
By admin | Updated: July 12, 2016 19:59 IST