शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

विदर्भासाठी राजकीय शक्ती वाढवण्याची गरज

By admin | Updated: January 25, 2015 00:49 IST

विदर्भात जिंकून मुंबईवर राज्य करता येते, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसने आजवर हेच केले असून भाजपही तेच करीत आहे. विदर्भाच्या भरवशावर जिंकून राज्यात आणि दिल्लीत सत्ता

विदर्भ कनेक्ट : श्रीहरी अणे यांचे प्रतिपादन नागपूर : विदर्भात जिंकून मुंबईवर राज्य करता येते, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसने आजवर हेच केले असून भाजपही तेच करीत आहे. विदर्भाच्या भरवशावर जिंकून राज्यात आणि दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणारे राजकीय पक्ष विदर्भाचे स्वतंत्र राज्य कधीच होऊ देणार नाही. त्यामुळे आता आपली शक्ती वाढवण्याची गरज आहे. राजकीय पक्षांना भीती वाटेल तेव्हाच आपली दखल घेतली जाईल. त्यामुळे आता विदर्भासाठी राजकीय शक्ती निर्माण करण्याची गरज असून भविष्यात ‘विदर्भ कनेक्ट’ हा राजकीय पर्याय म्हणून समोर येऊ शकतो, असे विदर्भ कनेक्टचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे संकेत दिले. ‘विदर्भ कनेक्ट’तर्फे शनिवारी रविभवन येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यवेळी ते बोलत होते. याप्रसंगी अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘विदर्भाच्या संघर्षाचा इतिहास व मागणी’ या विषयावर मार्गदर्शन करता अ‍ॅड. श्रीहरी अणे म्हणाले, विदर्भाबाबत अनेक आरोप केले जातात. मराठी भाषेच्या अस्मितेविषयी बोलले जाते. परंतु या चुकीच्या समजुती आहेत. त्याला बळी पडण्याची गरज नाही. प्रत्येक आयोगाने विदर्भ राज्य सक्षम असल्याचे म्हटले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही विदर्भासाठी नसून ती मुंबई गुजरातमध्ये सामील होऊ नये यासाठी होती. विदर्भ महाराष्ट्रात सामील करताना नागपूर करार करण्यात आला. पुढे त्याला कायद्याचे स्वरूप प्रदान करण्यात आले. त्या करारानुसार विदर्भाला लोकसंख्येप्रमाणे २२ टक्के अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणे, शिक्षण, नोकरीमध्ये सुद्धा २२ टक्केची तरतूद होती. परंतु हा करार कधीच पाळला गेला नाही. मागील तीन वर्षांची आकडेवारी सादर करीत अणे यांनी सांगितले की, मागील तीन वर्षात एकट्या पुणे विभागामध्ये ५२.२ टक्के नोकरी देण्यात आली. त्यावेळी नागपूर व अमरावती विभाग मिळून नोकरीचे प्रमाण केवळ २.५ टक्के होते. १९४७ ते ८० पर्यंत विदर्भाचा विकास झालाच नाही. विदर्भ राज्य हे सरप्लस होते. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळे तो आज मागे पडला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भाचा निधी विदर्भात कधीच खर्च होऊ दिला नाही. त्यांनी विदर्भाच्या निधीची चोरी केली, असा स्पष्ट आरोपही त्यांनी केला. यातून विदर्भाचा अनुशेष वाढत गेला. अनुशेषाचा अनुशेष निर्माण झाला. कायद्यात तरतूद करूनही नेत्यांनी विदर्भाेचा विकास केला नाही. परंतु आता तर कायद्याच्या चौकटीत राहून सुद्धा विदर्भाचा विकास शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी विदर्भात सातत्याने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी महत्त्वपूर्ण आकडेवारी व कारणांचे शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन केले. चंद्रकांत वानखेडे यांनी विदर्भ आंदोलनाची तीव्रता व दिशा आणि नितीन रोंघे यांनी विदर्भाची आर्थिक सक्षमता यावर प्रकाश टाकला. यावेळी अ‍ॅड. अणे यांनी कार्यकर्त्यांना विदर्भाची शपथ दिली. कार्यशाळेला अ‍ॅड. नीरज खांदेवाले, अ‍ॅड. रवि संन्याल, अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, अ‍ॅड. शैलेंद्र हरोडे आदींसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विदर्भ कनेक्टचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ यांनी प्रास्ताविक केले. संदेश सिंगलकर यांनी संचालन केले. दिनेश नायडू यांनी आभार मानले.(प्रतिनिधी) विदर्भासाठी आत्मदहन करणारयेत्या १५ आॅगस्टपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापन न झाल्यास शहीद गोवारी स्मारकाजवळ आपण आत्मदहन करणार, अशी घोषण सामाजिक कार्यकर्ते देवराव भवते यांनी याप्रसंगी केली. अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. बलिदान दिल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, त्यामुळे आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विदर्भातील जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती याप्रसंगी विदर्भ कनेक्टचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ यांनी विदर्भातील अकरा जिल्ह्याच्या अध्यक्षांची नियुक्ती केली. यामध्ये सी.बी. लढ्ढा (अकोला), अतुल गायगोले (अमरावती), अमोल बोरमोडे (यवतमाळ), राजीव गोरडे (वर्धा), अ‍ॅड. विठ्ठल तनपुरे (बुलडाणा), किशोर लांजेवार (भंडारा), दीपक डोहरे (गोंदिया), प्रा. नागपूरकर (वाशिम), अ‍ॅड. प्रमोद बोरावार (गडचिरोली), बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचा समावेश आहे.