शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ग्रा.पं. निवडणुकीत नेत्यांनी राखले गड

By admin | Updated: August 7, 2015 01:22 IST

नागपूर जिल्हातील १२३, तर चंद्रपूर जिल्ह्यातील ६१० ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला

नागपूर : नागपूर जिल्हातील १२३, तर चंद्रपूर जिल्ह्यातील ६१० ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ५४ ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित पॅनलने विजय मिळविला, तर भाजपला ४७ ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे १३, तर शिवसेनेला केवळ ६ ग्रामपंचायती आल्या. ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे गाव असलेल्या कोराडी येथेही निवडणूक झाली. त्यांनी पूर्ण ताकद या निवडणुकीत लावली. त्यामुळेच तेथे १७ पैकी सर्वच जागांवर भाजपाचा विजय झाला. कळमेश्वरमधील पाचपैकी चार ग्रामपंचायतीवर काँग्रेस उमेदवारांचा विजय झाल्याने आ. सुनील केदार यांनी या भागावर पकड असल्याचे दाखवून दिले. तर विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही नव्या दमाने माजी मंत्री अनिल देशमुख यांनी काम केल्याने नरखेड आणि काटोलमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या.चंद्रपुरात काँग्रेसची सरशीचंद्रपूर जिल्ह्यातील ६१० ग्रामपंचायतींच्या निकालात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. जिल्ह्णातील बहुतांश तालुक्यात काँग्रेसने मुसंडी मारली असून भाजपा दुसऱ्या स्थानावर आहे. जिल्ह्यातील चिमूर, कोरपना, बल्लारपूर, चंद्रपूर, पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही या तालुक्यात काँग्रेसप्रणित पॅनलचा विजय झाला आहे, तर भद्रावती, मूल, राजुरा, ब्रह्मपुरी तालुक्यात भाजपप्रणित पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वरोरा तालुक्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.नगरमध्ये मातब्बरांचा प्रभाव कायमकाँग्रेस-राष्ट्रवादीने ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक तरुणांना मतदारांनी संधी दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीसह काही गावात सत्तापरिवर्तन झाले आहे.सातारा जिल्ह्यात सत्तांतराची लाट!जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापितांना जबरदस्त ‘दे धक्का’ देत सत्तांतराची लाट उसळल्याचे चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. १०० पेक्षाही जास्त गावांमध्ये परिवर्तन झाले आहे.पनवेलमध्ये शेकापचे वर्चस्व : तालुक्यातील १५ पैकी १० ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने वर्चस्व सिद्ध केले.(प्रतिनिधी)