शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात चाराटंचाईचे चटके!

By admin | Updated: February 15, 2016 02:05 IST

मराठवाड्यात हिरवा चारा पाठवण्याची शक्यता.

अकोला : पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे यावर्षी राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, चार्‍याची टंचाई भासणार असल्याने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत वर्‍हाडातील पाच जिल्हय़ांत चारा लागवड करण्यात आली आहे. यातील काही हिरवा चारा दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाठवण्याची शक्यता आहे.यावर्षी पावसाने पाठ फिरवली असून, पश्‍चिम विदर्भातील अनेक भागात पाऊस नसल्याने या भागातील गुरांच्या चार्‍यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यात चारा लागवडीवर भर देण्यात आला आहे. अकोला जिल्हय़ात डिसेंबर २0१५ पासून चारा लागवड हाती घेण्यात आली आहे. अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फतही (महाबीज) वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात आला आहे. दरम्यान, सलग पाच वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत असून, मागील वर्षी चार्‍याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल भावात पशुधन विकण्याची पाळी आली होती. यावर्षी पुन्हा तेच चित्र निर्माण झाले आहे. परंतु कृषी विभागाने यावर्षी ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तेथे गतिमान वैरण विकास राबवला आहे. पूर्व विदर्भातही चारा लागवडीवर भर देण्यात आला आहे. मागीलवर्षी पाऊस नसल्याने विदर्भासह मराठवाड्यात भीषण दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात गुरांना चाराच नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर विदर्भातून काही हिरवा चारा मराठवाड्यात पाठवला जाणार आहे.ज्वारी पेरा कमी झाल्याचा परिणाम विदर्भातील खरीप व रब्बी ज्वारीचे उत्पादन घटल्याने त्याचा परिणाम पशू खाद्यावर झाला आहे. यावर उपाय म्हणून गतिमान वैरण कार्यक्रम राबविण्यात आला आहे; परंतु त्याचा फायदा किती होतो, याकडे पशूपालक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.