शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

विदर्भात कापूस ते कापड प्रकल्पांची उभारणी!

By admin | Updated: November 7, 2015 03:11 IST

विदर्भात ५८ प्रकल्प; अकोला जिल्हय़ात बाळापूर तालुक्यात टेक्सटाइल पार्कची उभारणी

राजरत्न सिरसाट/अकोला : कापूस ते कापड वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी राज्यभरात ५११ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले असून, विदर्भात ५९ प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. अकोला जिल्हय़ात बाळापूर तालुक्यात टेक्सटाइल पार्कची उभारणी केली जाण्याची शक्यता असल्याने, त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी विदर्भात साडेचार हजार कोटींवर गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीनंतर राज्यात ११ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.पार्श्‍वभूमीवर वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी २0११ पासून राबविलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे.विदर्भात ११ जिल्हय़ांत वस्त्रोद्योगाचे जाळे विणून ५ लाख नवीन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग संचालनालयाने २0११ ते २0१७ या पाच वर्षांकरिता हे धोरण आखले असून, वस्त्रोद्योग क्षेत्रात ४0 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. यासाठी वस्त्रोद्योग संचालनालय परिसंवादाच्या माध्यमातून उद्योजकांना प्रोत्साहन देत आहे. ह्यराज्य शासनाचे नवीन वस्त्रोद्योग धोरणह्ण या विषयावर शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी अकोल्यात परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात राज्यभरातील उद्योजकांची उपस्थिती होती. विदर्भातील उद्योजकांना येणार्‍या विविध अडचणींवर यावेळी चर्चा झाली. राज्य शासनाने ह्यमेक इन महाराष्ट्रह्ण धोरण आखले असून, त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. या धोरणांतर्गत राबविण्यात येणार्‍या योजनांमध्ये विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन वस्त्रोद्योग प्रकल्पांना १0 टक्के भांडवली अनुदान देण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत टफ योजनेशी निगडित दीर्घ मुदती कर्जावरील व्याजात सवलत, अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्याक समाजाच्या अस्तित्वातील यंत्रमाग घटकाच्या आधुनिकीकरणासाठी १0 टक्के भांडवली अनुदान, वस्त्रोद्योग संकुलांना ९ कोटी किंवा ९ टक्के अर्थसहाय्य दिले जाईल. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील सध्याच्या आकृतीबंधाप्रमाणे अर्थसहाय्य, कौशल्य विकास, यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल, कामगार कल्याण इत्यादी योजना आहेत. व्याज अनुदान योजनेंतर्गत मंजूर अर्थसाहाय्यविभाग              प्रस्ताव                     मंजूर अर्थसाहाय्य                                                               (रु. लाखांत)विदर्भ                   ३८                              २५५८.११मराठवाडा             ३९                               २५९.४४उत्तर महाराष्ट्र      ६६                                ८५२.७२उर्वरित महाराष्ट्र   २३३                               ६४४0.३६एकूण                 ३७६                               १0११0.६३१0 टक्के भांडवली अनुदान अर्थसाहाय्यविभाग                प्रस्ताव                  मंजूर अर्थसाहाय्य   (रु. लाखांत)विदर्भ                   १८                               २00१.१८मराठवाडा             ३६                                  ४८४.६0उत्तर महाराष्ट्र      ८१                                 १८४७.७0एकूण                १६५                                  ४३३३.४८*हिंगणघाट व अकोल्याचा प्रकल्प प्रेरणादायीहिंगणघाट व वणी रंभापूर (अकोला) या दोन प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून, हिंगणघाट प्रकल्पात कापूस ते कापडापर्यंत प्रक्रिया केली जाणार आहे. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरू न उभारण्यात आलेले हे प्रकल्प या भागात उद्योगांना चालना देणारे ठरणार आहेत. परदेशात उभारतात त्या पद्धतीने या प्रकल्पांची उभारणी झाली आहे. येत्या एक-दोन वर्षात या प्रकल्पात कापूस गेल्यानंतर थेट कापड बाहेर येणार आहे.

* बाळापुरात जागेची पाहणीटेक्सटाइल पार्कसाठी लागणारे पाणी, वीज व जागा उपलब्ध असल्याने वस्त्रोद्योग संचालनालयाच्या संचालक रिचा बागला यांनी बाळापूरच्या जागेची शुक्रवारी पाहणी केली.