शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

विधानसभेपूर्वी हवा विदर्भ !

By admin | Updated: May 23, 2014 00:57 IST

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे स्वतंत्र विदर्भ राज्याची आशा पुन्हा एकदा बळावली आहे. भाजपाच्या सर्वच नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले आहे, तेव्हा हा प्रश्न प्राधान्याने घेण्यात यावा

विदर्भ राज्य आंदोलन समिती : मोदी सरकारमुळे स्वतंत्र विदर्भ राज्याची आशा बळावली

नागपूर : नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे स्वतंत्र विदर्भ राज्याची आशा पुन्हा एकदा बळावली आहे. भाजपाच्या सर्वच नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले आहे, तेव्हा हा प्रश्न प्राधान्याने घेण्यात यावा आणि येत्या विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घेण्यात यावा, असा ठराव विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत एकमुखी घेण्यात आला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीची बैठक गुरुवारी गिरीपेठ आरटीओ कार्यालयाजवळील समितीच्या कार्यालयात पार पडली. माजी आयपीएस अधिकारी विक्रम बोके अध्यक्षस्थानी होते. लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच आटोपल्या. नरेंद्र मोदींचे सरकार सत्ता सांभाळणार आहे. जनतेने नरेंद्र मोदी यांना भरभरून मते दिली. निवडणुकांमध्ये भाजपने लहान राज्यांचे समर्थन केले आहे. इतकेच नव्हे तर भाजपाचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याला आपला पाठिंबा असून, निवडून आल्यास त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लिहून दिले आहे. केंद्रात भाजपाला स्वबळावर सत्ता मिळाली असल्याने स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घेताना इतर पक्षांवर अवलंबून राहण्याची गरज नाही, या सर्वांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्याबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विदर्भ राज्याला असलेले भाजपाचे समर्थन आणि एकहाती मिळालेली सत्ता तेव्हा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन त्यांनी येत्या विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य घोषित करावे आणि दोन्हीच्या निवडणुका सोबत घ्याव्यात, असा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीत कोर कमिटीचे सदस्य अ‍ॅड. वामनराव चटप, बलबीरसिंह रेणू, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती, राम नेवले, दीपक नीलावार, धर्मराज रेवतकर, धनंजय धार्मिक, अरुण केदार, दीपक नवरिया, सौरभ दिवटे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, मंगलबाबू चिंडालिया, डॉ. रमेश गजबे, राजेंद्रसिंग ठाकूर, शेरखाँ पठाण, शालिक नाकाडे, दुर्वास धार्मिक, अ‍ॅड. पी.एम. टेंभूर्णे आदी उपस्थित होते. आंदोलन सुरूच राहणार भाजपा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ असला तरी लगेच विदर्भ राज्य मिळेलच असे नाही. त्यामुळे विदर्भाची मागणी सातत्याने लावून धरण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णयसुद्धा कोर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यादृष्टीने आंदोलनाची दिशा ठरवित ४ व ५ जून रोजी नागपूर आणि अमरावती येथे धरणे आंदोलन करण्याचे निश्चित झाले. स्वतंत्र विदर्भ राज्याचा मार्ग मोकळा भाजपने नेहमीच स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले आहे. मी स्वत: या मागणीसाठी जनजागृती रॅली काढली. उपोषण केले. तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी माझ्या आंदोलनाची दखल घेतली आणि आमचे राज्य आल्यास वेगळे विदर्भ राज्य करू, असे आश्वासन दिले. जनतेने त्यांना भरभरून मते देत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. त्यामुळे आता स्वतंत्र विदर्भ राज्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे युथ फॉर विदर्भचे प्रणेते आशिष देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)