शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ आणि मराठवाड्यात अनुदानित सोयाबीनचा तुटवडा !

By admin | Updated: June 13, 2016 04:29 IST

शासनाने अनुदानावर सोयाबीन बियाणे देण्यास सुरुवात केली असली तरी औसा आणि देवणी तालुक्यातील वलांडी येथे हे बियाणे आले, आले म्हणेपर्यंत संपून गेले.

लातूर : दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनुदानावर सोयाबीन बियाणे देण्यास सुरुवात केली असली तरी औसा आणि देवणी तालुक्यातील वलांडी येथे हे बियाणे आले, आले म्हणेपर्यंत संपून गेले. त्यामुळे केंद्रावर बियाणांसाठी रांगा लावलेल्या शेतकऱ्यांना हात हलवत परतावे लागले़ औसा तालुक्यात चार वर्षांपासून सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे़ गेल्या वर्षी पेरण्या झाल्या़ पण उत्पादनच झाले नाही. त्यामुळे यंदा घरगुती बियाणेच नाही. परिणामी, शेतकरी सोयाबीनच्या बियाणांच्या शोधात आहेत. महाबीजने औसा तालुक्याला १५७५ क्विंटल सोयाबीन बियाणे अनुदानावर देण्याचे जाहीर केले़ त्यामुळे २२५० रुपयांची एक बॅग १५०० रुपयांस मिळत आहे़ शुक्रवारपर्यंत ३४७.४० क्विं़ बियाणे आले आणि लगेच संपले देखील. त्यामुळे शेतकरी कृषी कार्यालय गाठत आहेत आणि तेथे अधिकारी त्यांना उत्तरे देता- देता वैतागले आहेत.देवणी तालुक्यास १०० टन सोयाबीन बियाणे अनुदानावर दिले जाणार असतानाही केवळ १० टनच बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे़ वलांडी येथील लक्ष्मीकांत कृषी केंद्राचे लक्ष्मीकांत बंग म्हणाले, बियाणांची मागणी १०० टनाची होती़ मात्र १० टनच बियाणे आले आहे़ उर्वरित बियाणे सोमवारी उपलब्ध होईल़ (प्रतिनिधी)अमरावती विभागातही टंचाई : अमरावती विभागात यंदा खरिपाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून, सोयाबीनसह उडीद, मूग आणि तूर या पिकांच्या पेऱ्यात वाढ होणार आहे. तथापि, त्यासाठी आवश्यक असलेल्या बियाण्याची टंचाई शेतकऱ्यांना भासत असल्याचे दिसत आहे. प्रस्तावित आकडेवारीनुसार यंदा विभागात पाच लाख क्विंटलहून अधिक सोयाबीन बियाणे, ४२ हजार क्ंिवटल तूर बियाणे, तर प्रत्येकी आठ हजार क्विंटल उडीद आणि मूग बियाण्याची आवश्यकता आहे. तथापि, मागणीच्या तुलनेत सोयाबीनच्या केवळ १ लाख ८० हजार बियाण्यांचा पुरवठा झाला आहे.