शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
2
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
3
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
4
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
5
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
6
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
7
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
8
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
9
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
10
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
11
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
12
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
13
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
14
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
15
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
16
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
17
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
18
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
19
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
20
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया

वडाळे तलावातील गाळाचे प्रकरण विधानसभेत

By admin | Updated: July 31, 2016 02:18 IST

ऐतिहासिक वडाळे तलावातून गाळ काढण्यात आला, मात्र त्यांचे वाढीव बिल लावण्यात आल्याचा आरोप होत आहे.

पनवेल : ऐतिहासिक वडाळे तलावातून गाळ काढण्यात आला, मात्र त्यांचे वाढीव बिल लावण्यात आल्याचा आरोप होत आहे. या विषयाचे पडसाद थेट विधानसभेत उमटले आहेत. विदर्भातील एका आमदाराने विधानसभेत प्रश्न मांडत या तलावातून नेमका किती गाळ काढला? हा गाळ चर्चेला आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. नेमका गाळ किती काढला, असे प्रश्न विचारत यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. चिमाजी आप्पा आपले सैन्य घेऊन पनवेलला मुक्कामी होते, तेव्हा त्यांनी पनवेलकरांसाठी बक्षीस म्हणून बल्लाळेश्वर मंदिराच्या बाजूला विस्तीर्ण तलाव खोदून दिला. त्याला वडाळे तलाव म्हणून ओळखले जाऊ लागले. बाजूलाच अशोक बाग असल्याने या परिसराचे सौंदर्य अधिक खुलले होते. या तलावाद्वारे एकेकाळी पनवेल शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत होता. कालांतराने वडाळे तलावाकडे दुर्लक्ष होत गेले. पनवेलमधील या सौंदर्यस्थळाच्या देखभालीकडे लक्ष न दिल्यामुळे या तलावावर संपूर्ण जलपर्णी पसरते. तळ्यालगत मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत असून, त्याचे सांडपाणीही तलावात सोडले जात असल्यामुळे हे पाणी दूषित झाले आहे. दूषित पाणी तसेच पुरेसा प्राणवायू व सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे या तलावातील शेकडो मासे तसेच अन्य जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. बाजूलाच असलेल्या बल्लाळेश्वर मंदिरात येणारे भाविक निर्माल्य आणि इतर वस्तू तलावात टाकतात. तसेच आजूबाजूचा कचरा तलावात जाऊन पाणी प्रदूषित होत आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने किमान विसर्जन घाटापर्यंत गाळ काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्याकरिता पोकलेन, जेसीबी, डम्पर आणि मजूर असे चार ठेकेदार नियुक्त करण्यात आले. सुरुवातीला लोकसहभागातून हा गाळ काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर बिल लावण्यात आले. तलावातील नेमका किती क्युबिंग मीटर गाळ काढण्यात आला, याबाबत पालिकेकडे नोंद नाही. ५०० डम्पर गाळ काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. मात्र तलावातून गाळ काढून तो काठावर आणण्यात आला. त्यानंतर तो पायोनीअर आणि हरिओम नगरलगतच्या रस्त्यावर टाकण्यात आला. मात्र त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे तो पुन्हा उचलून दुसरीकडे टाकण्यात आला आहे. नियोजन नसल्याने याचा भुर्दंड पनवेल नगरपालिकेला बसला. वास्तविक पाहता जितके डम्पर दाखविण्यात आलेत, तितका गाळ काढण्यात आलेला नाही.एका आमदाराने हा विषय विधानसभेत उठवल्यानंतर नगर परिषद याबाबत काय उत्तर देते, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)